-->
करमाळासामाजिक

राष्ट्रीय रविदास परिषदेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी इंजि. अनमोल वाघमारे यांची निवड

 प्रतिनिधी/प्रविण आवचर

करमाळा येथील इंजिनिअर, उच्चशिक्षित, सामाजिक कार्यकर्ते
श्री. अनमोल वाघमारे यांची
नुकतीच राष्ट्रीय रविदास परीषदेच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. तसे अधिकृत पत्र राष्ट्रीय रविदास परिषदेचे राज्य सचिव श्री. राजीव भरडे यांनी दिले आहे.

अनमोल हे पूर्वीपासूनच नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. सध्या ते बार्शी येथे कुटुंबियासह स्थायिक असुन सध्या बार्शी येथेच एल.एल.बी ची पदवी पूर्ण करत आहेत. त्यांचे सुविद्य पत्नी ॲड. सौ. प्राजक्ता वाघमारे व श्री अनमोल यांनी शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी अनेक प्रकारचे ऍग्री कल्चर प्रोजेक्ट राबवले आहेत. यामुळे बार्शी सह करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना ही आधुनिक तंत्रज्ञानातूंन आंतरपीक घेऊन मोठा फायदा झाला आहे. शहरातील सुशिक्षित तरुणांना एकत्र करून, व्यावसायिक मार्गदर्शन करून त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे. समाजातील गरजू लोकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देणे. कोरोना काळातही त्यांनी अनेकांना मदत केली आहे. बऱ्याच रुग्णांच्या आरोग्य विषयक तक्रारींचे निवारण केले आहे. अशी अनेक कामे श्री. अनमोल वाघमारे निस्वार्थीपणे करत असतात. त्यांची ही समाजाप्रती निस्वार्थी पणे कार्य करण्याची तळमळ पाहूनच आज संघटनेने त्यांच्यावरती सोलापूर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे.

आपण संघटनेशी प्रामाणिक राहून संघटनेच्या माध्यमातून क्रांती कारी संत व फुले, शाहू, आंबेडकर या महापुरुषांची विचारधारा आपल्या समाजात पेरून समाज परिवर्तनाच्या चळवळीचा धागा बनणार असे मत श्री. वाघमारे यांनी आमचे प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केले. त्यांच्या या निवडीवरून करमाळा शहर व परिसरातील मित्रपरिवार आणि तरुणांनी आनंद व्यक्त केला. तसेच इंजि. श्री. अनमोल यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close