-->
क्राईममहिलाविषयकराज्य

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार; पोलिसात गुन्हा दाखल

हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; तक्रार मागे घेण्यासाठी पीडितेला धमक्या

 

 

माय मराठी न्युज नेटवर्क

कदमवाक वस्ती, हडपसर येथील एका खाजगी कंपनीच्या मनुष्यबळ व्यवस्थापकाने आपल्याच कंपनीमध्ये काम करीत असलेल्या नोकरदार तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला आहे. याशिवाय आपले पाहिले लग्न झाले असल्याची बाब पीडित तरुणीपासून लपवून तिची फसवणूक केली आहे. या प्रकरणी सदर मनुष्यबळ व्यवस्थापकावर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, निलेश अरविंद मोरे (मुळगाव सोनवडी सुपे ता. बारामती सध्या रा. हडपसर, पुणे शहर) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. पीडित तरुणी ही कदमवाक वस्ती, हडपसर येथील एका खासगी कंपनीत नोकरीस लागली होती. त्याच कंपनीतील मनुष्यबळ व्यवस्थापक निलेश मोरे याने पीडित तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तो विवाहित असल्याचे त्याने पीडित तरुणीपासून लपवून ठेवले. तसेच पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेवून तिच्याबरोबर वेळोवेळी इच्छा नसताना अनैतिक शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दरम्यान, संशयित आरोपी हा विवाहित असून त्याला एक मुलगा व एक मुलगी असल्याचे समजल्यावर पीडित तरुणीने आरोपीला जाब विचारला. त्यावेळी त्याने सांगितले की, माझे तुझ्यावर खुप प्रेम आहे. तु मला सोडून जाशील या भीतीने मी तुला माझे लग्न झाल्याचे सांगितले नाही.

पीडित तरुणीने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यामुळे त्याला पुन्हा जाब विचारला असता त्याने तिला धमकावणे सुरू केले. तिचा मोबाईल हिसकावून घेतला. या त्रासाला कंटाळून पीडितेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पीडित तरुणीच्या कुटुंबीयांनी धीर दिल्याने तिने आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. मात्र, सदर तक्रार मागे घेण्यासंदर्भात आरोपी सतत धमकावत असल्याचेही पीडित तरुणीने सांगितले आहे.

या प्रकरणी अधिक तपास हडपसर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शेळके साहेब हे करीत आहेत.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close