केम प्रतिनिधी: संजय जाधव


करमाळा तालुक्यातील केम येथे आज दिनांक ०४/०८/२०२१ रोजी दुपारी केम ग्रामपंचायती मध्ये केम महसूल गावांतर्गत वाड्या-वस्त्यांवरील सर्व जिल्हा परिषद शाळांचे मुख्याध्यापक व सर्व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक यांची गावातील कोरोना आटोक्यात ठेवण्या संदर्भात आपत्ती व्यवस्थापन समितीचे सचिव व केम ग्रामपंचायतीचे ग्राम विकास अधिकारी श्री. नवनाथ सातव भाऊसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.
यावेळी सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध (आण्णा) कांबळे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. त्यांनी तुम्ही कोरोना आटोक्यात आणण्याचा जो उपक्रम राबवत आहात त्यास माझे पूर्ण सहकार्य राहील असे आश्वासन दिले. तसेच केम पोलीस आऊट पोस्टचे कॉन्स्टेबल श्री. शिंदे साहेब यांनीही उपस्थिती दाखवून चर्चेत सहभाग घेतला आणि पोलीस स्टेशनचे या कामांमध्ये पूर्ण सहकार्य असेल असे आश्वासन दिले.
यावेळी केम केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. महेश्वर कांबळे, श्री उत्तरेश्वर माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. कदम सर, नूतन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. रंदवे सर, राजाभाऊ तळेकर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. विनोद तळेकर सर, शा. गो. पवार विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. देवकर सर त्याचप्रमाणे आश्रम शाळेचे श्री. वाघमोडे सर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केम शाळेचे श्री. राजकुमार वासकर गुरुजी, तळेकर -१ चे भगवंत लोणकर, तळेकर- २ चे प्रमोद दीक्षित, बिचीतकर-१ चे श्री. सतीश कळसाईत, बिचीतकर -२ चे मंगेश सोलापूरे, दोंडवस्तीचे श्री. नंदकुमार तळेकर, खानवट वस्तीचे श्री. अय्युब मोमीन, बारवकर वाडीचे श्री. ज्ञानेश्वर चांदगुडे, घुटकेश्वरचे श्री. अतुल मारवाडी हे उपस्थित होते.
या सर्वांच्या चर्चेतून सोमवार दिनांक ०९/०८/२०२१ रोजी पासून गावच्या दोन्ही वेशी व चौकामध्ये सकाळी ०८:०० ते ११:०० या वेळेत ट्रेसिंग करण्याचे नियोजन करण्यात आले असून त्याप्रमाणे कार्यवाही करण्याच ठरले आहे.



