-->
क्राईमदेशविशेष

धक्कादायक: मोठ्या भावाने केला लहान भावाचा खून; कारण वाचून आश्चर्याचा धक्काच बसेल!

 

माय मराठी न्युज

बिहार राज्यांमधील कैमुर जिल्ह्यातील मोहनिया ठाण्याच्या क्षेत्रातील सोंधी गावात एक अत्यंत धक्कादायक व माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. यात एका तरुणाने आपल्या लहान भावाला अशी शिक्षा दिली की, यात लहान भावाचा जागीच मृत्यू झाला आहे. आरोपीने आपल्या लहान भावाकडे पाचशे रुपयांची मागणी केली होती. जे पाचशे रुपये त्याने काही दिवसांपूर्वी आपल्या लहान भावाला दिले होते. मात्र, आत्ता लहान भावाने पैसे देण्यास नकार दिल्याचा आरोपीला राग आला. यानंतर त्याने लहान भावाला काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी मारहाण करताना त्याला हे देखील समजले नाही की, त्याच्या लहान भावाचा मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या आरोपीचे नाव रामू असून तो मजुरी करतो. यावेळी आरोपीने सांगितले की, लहान भाऊ काहीही काम करत नव्हता. मात्र, याच दरम्यान त्याला नशा करण्याची सवय लागली. अनेकदा सांगून ही तो सुधारला नाही. एकदा लहान भावाला पाचशे रुपये दिले होते. त्या पैशाबाबत त्याला विचारणा केली असता त्यांने काहीच सांगितलं नाही. यानंतर रामू त्याच्याकडे आपले पैसे परत मागू लागला. मात्र, लहान भावाने पैसे दिले नाहीत.

याच गोष्टीचा राग मनात धरून रामूने आपल्या लहान भावाला काठीने मारहाण केली. या घटनेत अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी गावकऱ्यांनी गर्दी केली होती. पोलिसांनी अल्पवयीन मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे तर आरोपी असलेल्या मोठ्या भावाला अटक केली आहे. केवळ पाचशे रुपयांसाठी तरुणाने आपल्या लहान भावाचा जीव घेतला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close