-->
राज्यविशेषसामाजिक

मुळशी व कोकणातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट कडून मदतीचा हात; गाडी मार्गस्थ!

 

पुणे | माय मराठी न्युज

“लाभला आम्हांस शिवशंभूंचा वारसा” या ब्रीद वाक्याने श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसलेयुवराज छत्रपती संभाजीराजेंच्या मार्गदर्शनाखाली श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट कमिटी महाराष्ट्र राज्याच्या वतीने रक्तदानामध्ये महाराष्ट्रभर कायम मदत चालू असताना आज दि.१ ऑगस्ट रोजी मुळशी तालुक्यातील माले या गावात ढगफुटी व अतिवृष्टी झाल्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. परंतु कोकणात बऱ्याच लोकांनी मदत केल्यामुळे हे गाव मदतीपासून वंचित होते हे समजताच ट्रस्ट च्या वतीने या गावास अत्यावश्यक साहित्याची मदत करण्यात आली.

व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा

यामध्ये माळशिरस तालुका अकलूज, जय भवानी ग्रुप बागेचीवाडी, बारामती, इंदापूर, पुणे, औदुंबर ढोल ताशा पथक, कल्याण (मुंबई), सर्व विभागातील शिवशंभू ट्रस्ट पदाधिकाऱ्यांचे तसेच अक्षय ब्लड बँक, हडपसर व पंढरपूर ब्लड बँक यांचेही विशेष सहकार्य लाभले.

तत्पूर्वी काल रात्री कल्याण येथून औदुंबर ढोल ताशा पथकाचे सर्वेसर्वा व शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट कल्याण शहर अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई मधून चिपळूणच्या दिशेने पहिली गाडी मार्गस्थ करण्यात आली. त्यानंतर आज पुण्यातून शुक्रवार पेठ व पोलीस लाईन स्वारगेट इथून दुसरी गाडी मार्गस्थ करण्यात आली. यावेळी मदतीची गाडी मार्गस्थ करताना शिवशंभू ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष शिवश्री भूषण सुर्वे, खडक पोलीस स्टेशनचे पी.आय. मा. गाडे साहेब, चव्हाण मॅडम महिला सेल काँग्रेस राष्ट्रीय सरचिटणीस, पोलीस कॉन्स्टेबल मंगेश गायकवाड, शिवशंभू ट्रस्ट पुणे महिला अध्यक्ष सोनालीताई जाधव, पुणे शहर संपर्क प्रमुख अमित कुचेकर, बारामती तालुका कार्याध्यक्ष माउली खाडे, पुणे शहर कार्याध्यक्ष राहुलजी भोसले, माळशिरस तालुका अध्यक्ष रणजितदादा गायकवाड, राष्ट्रवादी युवक पुणे शहर युवकचे अच्युत लांडगे, सुशांत पाटील, सिद्धार्त चव्हाण, सौ. वनिता जाधव व शिवशंभू ट्रस्टचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

ही मदत शारदा दातीर व विनोद दातीर (पोलीस पाटील – माले) यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली. यावेळी माले गावाच्या वतीने सरपंच व पोलीस पाटील यांनी शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टच्या कामाचे अभिनंदन केले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close