करमाळा प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


करमाळा तालुक्यातील मांगी येथे गुरुवार दि.२९ जुलै रोजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त संजय मामा शिंदे मोटार वाहतूक संस्थेच्या वतीने मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिराचे उद्घाटन करमाळ्याचे तहसीलदार समीर माने यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबीरामध्ये ५०० नागरिकांनी आपला सहभाग नोंदवत नेत्र तपासणी केली.
व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा
यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते सुजित तात्या बागल म्हणाले की, वाढदिवसानिमीत्त होणारा अनावश्यक खर्चाला फाटा देत मांगी व परिसरातील नागरिकांना याचा उपयोग व्हावा या उद्देशाने सदर शिबीराचे आयोजन केले आहे. कोरोना काळातील निर्बंधांमुळे या शिबीराचे आयोजन करता येत न्हवते. मात्र सर्व शासकीय नियमांचे पालन करून व योग्य ती काळजी घेत हे शिबीर घेण्यात आले. या शिबिरात सहभागी झालेल्या नागरिकांच्या डोळ्याची तपासणी करुन गरजू रुग्णांना मोफत चष्मे देण्यात आले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते श्रेणिक खाटेर, प. स. सदस्य दत्ता जाधव, वीटचे सरपंच उदय ढेरे, सावंत गटाचे नेते सुनिल बापू सावंत, आशपाक जमादार, विकास वीर, पोथरेचे शहाजी झिंजाडे, निंभोरचे रविंद्र वळेकर, जातेगावचे तुषार शिंदे, मनिषा झिंजाडे, तेजस ढेरे, बबन मुरुमकर, नंदु इरकर, ग्रा.सदस्या कु. स्नेहल अवचर, मांगी ग्रामस्थ आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
या शिबीरात सोलापूर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गणेश इंदुरीकर, करमाळा येथील नेत्ररोग तज्ञ डॉ. ज्ञानदेव केमकर, नेत्र चिकित्सक अधिकारी डॉ. अनिल खटके, कोर्टी येथील नेत्रचिकित्सक अधिकारी डॉ. सखाराम गर्जे, टेंभुर्णी येथील नेत्रचिकित्सक अधिकारी डॉ. अनिल बांगर, सोलापूर येथील डॉ. अशोक शिंदे यांनी नोंदणी केलेल्या नागरिकांची नेत्र तपासणी केली.



