करमाळा प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


आज दि.२९/७/२०२१ रोजी करमाळा तालुका भारतीय जनता पार्टी संपर्क कार्यालय येथे तालुकाध्यक्ष मा. गणेश (भाऊ) चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मोर्चाचे शहराध्यक्ष ऋषीकेश फंड यांनी युवा मोर्चा शहराच्या उपाध्यक्षपदी कमलेश ज्ञानदेव दळवी यांची तर तेजस प्रकाश बोकन यांची कोषाध्यक्षपदी निवड केली.

यावेळी तालुका अध्यक्ष गणेश (भाऊ) चिवटे यांनी त्याच्या निवडीबद्दल त्याचा सत्कार केला आणि भाजपाचे विचार, ध्येय आणि धोरणे युवा पिढीत पोहचवण्याचे कार्य या माध्यमातून तुम्ही करावे. तसेच शहरात असणाऱ्या युवकांच्या समस्या व अडचणी सोडवण्यासाठी कायम तत्पर रहावे असे सांगितले.
यावेळी भाजप तालुका उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष सचिन गायकवाड, ओबीसी मोर्चा तालुका सरचिटणीस भैय्या गोसावी, युवा मोर्चा उपाध्यक्ष हर्षद गाडे, विशाल साबळे, अनिकेत इंदुरे, भूषण महाजन, प्रतिक चव्हाण, रोहित चिवटे, आशिष न्हावकर, सचिन भणगे, प्रसाद चिवटे, शैलेश राजमाने आदी कार्यकर्ते उपस्थित होते.



