माय मराठी न्युज प्रतिनिधी


घरामध्ये एक फॅन… एक बल्ब… रोज उठुन एकाच्यात कामावर जायचं… पण घरातील लाईटबील आलं दिड लाख… गेल्या दिड महिन्यापासून या महिला महावितरण कार्यालयात हेलपाटे घालतात… दाद कुणीच देईना… मात्र आज अचानक ‘जनशक्ती’चे नेते अतुल खुपसे पाटील महावितरण कार्यालयात गेले अन् त्यांनी कार्यालयात ताब्यात घेतले… अधिकाऱ्यांना धारेवर धरले… तोडगा काढला… अन् गेल्या दिड महिन्यापासुन पंढरपूर तालुक्यातील चळे येथील अंधारात असलेली चळे वस्तीत प्रकाश पडला.
याचे झाले असे की, जनशक्ती संघटनेचे गणेश ढोबळे काही शेतकऱ्यांना घेऊन महावितरण कार्यालयात डीपी संदर्भात गेले होते. काही वेळातच कार्यालयात जनशक्तीचे अध्यक्ष अतुल खुपसे पाटील येणार आहेत असे सांगताच महावितरण कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी लागलीच पोलीस बंदोबस्त मागविला. दरम्यान खुपसे पाटील यांना पोलीसांनी महावितरणच्या कार्यालयाच्या गेटवर अडवण्याचा प्रयत्न केला. परंतु ‘मी आंदोलनाला नाही अधिकार्यांबरोबर चर्चा करण्यासाठी आलो आहे’ असे सांगताच पोलिसांनी काही अटीवर त्यांना महावितरण अधिकारी यांना भेटण्याची परवानगी दिली.
इकडे शेतकरी नेते माऊली हळणवर काही दलित महिलांचे प्रश्न घेवुन महावितरण कार्यालयात आले. दीड दीड लाख लाईटबील आल्याने त्यांची वीज तोडली होती. घरात लाईट नसल्यामुळे त्या अंधारात राहत होत्या. हि बाब अतुल खुपसे यांना समजताच त्यांनी मुख्य कार्यकारी अभियंता संजय गवळी यांना याच प्रश्नावर धारेवर धरलं. आमदार, खासदार यांच्याकडे असणारे थकीत बिल, चळे परिसरात असणारे आकडे याची माहिती मागताच गवळी यांची भंबेरी उडाली. दिड लाखांचे आलेले बील पैकी १५ हजार भरायचे, सर्वांना नविन मिटर बसविले जातील असे आश्वासन गवळी यांनी दिले त्यामुळे गेल्या दीड महिन्यापासून जे गाव, जी वस्ती अंधारात होती त्या वस्तीमध्ये जनशक्ती संघटनेच्या एका चर्चेने प्रकाशमय झालं.
या दलित महिलांचा आनंद गगनात मावेना त्यांनी आपला आनंदोत्सव पेढे वाटून साजरा केला. यानंतर उंबरे गावातील डीपी चा प्रश्नाबाबत कार्यकारी अभियंता यांना अतुल भाऊंनी जाब विचारला कार्यकारी अभियंत्यांनी दोन डीपी चे काम करून देतो असे आश्वासन दिले.
गुन्हे कितीही झाले तर बेहत्तर
– सर्वसामान्य लोक शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन आम्ही नेहमीच लढत राहणार. यासाठी कितीही खडतर प्रवास करावा लागला तर आम्ही मागे हटणार नाही. शिवाय कायद्याचा धाक दाखवून, पोलीस बळाचा वापर करून जर कोणता शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी दबाव आणून आमची ताकद दाबण्याचा प्रयत्न करत असला तर त्यांनी ते मनातून काढावे. आम्ही फक्त सर्वसामान्य व शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठीच जन्मलो आहोत. आमच्यावर कितीही गुन्हे दाखल झाले तरी बेहत्तर आम्ही कधीच शांत राहणार नाही.
– माऊली हळणवर



