-->
राज्यविशेष

शेजारील घरांवर कोसळली चार मजली इमारत;५ जण गंभीर जखमी

 

माय मराठी न्युज नेटवर्क

 

मुंबईत मंगळवारी मध्यरात्री १२:३० च्या दरम्यान अंधेरी पश्चिम मधील मेहता बाबा चाळ ही चार मजली इमारत बाजूला लागून असलेल्या घरांवर कोसळली. या इमारतीचे बांधकाम सुरु असल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात ५ जण गंभीररीत्या जखमी झाले असून त्यांना कूपर रुग्णालयात तातडीने दाखल केले आहे. या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे वृत्त मिळाले आहे.

 

मुंबईत इमारत दुर्घटनांचे सत्र अद्याप सुरूच आहे. मागील आठवड्यात गोवंडीत इमारतीचा भाग कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच अंधेरीत बांधकाम सुरू असलेली इमारत घरांवर कोसळली आहे. या दुर्घटनेत पाच जण गंभीर जखमी आहेत.

 

अंधेरीत असलेल्या या इमारतीचे बांधकाम सुरु असताना ही इमारत जवळच्या घरांवर कोसळली. या अपघातात अकबरशेख, आरीफ शेख, चांद शेख, अजरा शेख, शमशुद्दीन शेख असे जखमी झाले आहे. त्यांना ताबडतोड उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. सदर घटनेची माहिती मिळतातच अग्निशमनदलाच्या जवानांनी धाव घेतली असून मदतकार्ये सुरु केले आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close