-->
करमाळासामाजिक

करोनाची तिसरी लाट येण्यापुर्वीच घ्या खबरदारी

 

हवेली  प्रतिनिधी : प्रविण शेंडगे

शब्दांकन ✍🏻
सौ. वैजयंता महेश गजरे.
अध्यक्षा: १ अर्थ सोशल फांउडेशन, पुणे .

३१ डिसेंबर २०१९ ला चीन मधील वूहान शहरांमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. करोना संसर्गजन्य आजार आहे त्यामुळे या रोगाचा प्रसार जगभर झपाट्याने झाला. भारतातील केरळ राज्यात २७ जानेवारी २०२० ला पहिला रुग्ण आढळला. रोगाचा प्रसार रोखण्यासाठी मग संपूर्ण देशात लाॅकडाउन केले गेले. यावेळी उपासमारीची वेळ येवू नये म्हणून कित्येक स्थलांतरित कामगारांचे स्थलांतर झाले. अनेक छोटे मोठे व्यावसायिक, कंञाटी मजूर, शेतकरी वर्गाला चांगलीच झळ बसली. कित्येक उद्योग बूडाले. करोना आजारामुळे कित्येकांना प्राण गमवावे लागले. शाळा महाविद्यालये बंद पडली. यातून बाहेर पडण्यासाठी शासकीय यंत्रणा, समाजसेवी संस्था, पोलिस, वैद्यकीय सेवा, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामपंचायत सर्वच स्तरातून मदत केली. पण तरीही या संकटातून बाहेर पडण्यासाठी आपल देश व व्यवस्था पुर्णपणे स्वावलंबी नाही. सामाजिक सुरक्षा, जनजागृती, संभाव्य धोके आणि त्या अनुषंगाने उपाय योजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी तरुणांचा सहभाग महत्त्वाचा आहे. लसीकरणाची सुरुवात झाली आहे. लस वेळेवर घ्या. त्यामुळे रोगाची तिव्रता कमी होईल.

तब्बल दुसरे वर्ष संपत आले असताना देखील परिस्थिती अजूनही गंभीरच आहे.
या साठी उपाय योजना म्हणून प्रत्येकाने आत्मपरीक्षण करणाची गरज आहे.

१. ताजा व पौष्टिक आहाराचे सेवन करने गरजेचे आहे.
२. आहाराबरोबरच व्यायाम करावा.
३. सर्वांत महत्वाचे आहे मानसिक आरोग्य , यासाठी योगा, प्राणायाम व ध्यान धारणा करावी. निसर्गाच्या सानिध्यात थोडीतरी वेळ घालवावा.
४. लहान मुलांना दूरदर्शन व मोबाईल पासून दूर ठेवून वृक्षारोपण, सायकलिंग, खेळ यासाठी प्रोत्साहन दिल्याने त्यांचा शारीरिक व मानसिक विकास उत्तम होईल.
५. गर्दीत जाने शक्यतोवर टाळावे पण आवश्यकता आसल्यास सर्व सुरक्षिता उपाय योजनांचे पालन करावे.
६. एखाद्या कुटुंबास जर काही वैदयकीय मदत लागली तर आवश्य करावी.

या संकटातून आपण एकमेकांच्या सहयोगातून व आधारातूनच बाहेर पडणार आहोत.

सुरक्षिततेचे नियम पाळा आणि करोनाच्या तिसऱ्या लाटेला हरवा.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close