-->
करमाळासामाजिक

गायक तुषार घोडके यांच्या वाढदिवसानिमत्त कौतुकास्पद उपक्रम

 

माय मराठी न्युज नेटवर्क

अहमदनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध युवा गायक मिरजगावचे सुपुत्र
तुषारकुमार घोडके यांनी स्वतःच्या वाढदिवसा निमित्त सामाजिक बांधिलकी जपत हरी नरके लिखित ‘शोधाच्या नव्या वाटा’ हे पुस्तक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील अर्थशास्र विभाग प्रमुख श्री. आढाव सर याना भेट दिले.

या पुस्तकातून विद्यार्थ्यांना मोठी प्रेरणा मिळनार असल्याचं त्यांनी सांगितले. तुषारकुमार घोडके यांचं पदवी शिक्षण हे सावित्रीबाई फुले पुणे, विद्यापीठात सुरु असून सध्या त्यांचा मिरजगाव येथे स्वर सम्राट या नावाचा ऑर्केस्ट्रा आहे.
तुषारकुमार यांनी खूप कमी वयात जिद्दीन आपल्या वेगळ्या कामाचा ठसा उमटवला आहे.
कर्जत, जामखेड तालुक्यासह मिरजगाव पंचक्रोशीत सामाजिक कार्यात त्यांचा नेहमी उस्फुर्त प्रतिसाद असतो. गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या, रस्त्याची समस्या, अशाप्रकारचे कोणतेही सामाजिक काम तुषार स्वकष्टाने करतो. अलीकडे, कोरोना संकटात त्यांनी आमदार रोहित दादा पवार यांचे मार्गदर्शनाखाली गरजू रुग्णांना वेळीच उपचार उपलब्ध करून देऊन अनेकांचे प्राण वाचवले. अनेक गरजू गरीब कोरोनाग्रस्त रुग्णांना तातडीने उपचार मिळावे म्हणून तुषार यांनी स्वखर्चाने गाडी उपलब्ध करून त्यांना शहरात उपचारासाठी पोहोच केले. अशी अनेक प्रकारचे सामाजिक कार्य तुषार यांचे हातुन घडत असतात. याकामी आई सौ. सरस्वती घोडके व वडील श्री. भगवान घोडके यांचे हि वेळोवेळी सहकार्य असते.

गायकी बरोबरच पदवीच शिक्षण पूर्ण करत सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असनारे तुषारकुमार यांचे कार्य असेच सूरु राहो.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close