-->
राजकिय

शिवसेनेचा जुना वाद चव्हाट्यावर; आजी-माजी आमदार समर्थकांमध्ये जोरदार मारामारी

परांडा शिवसेना तालुका प्रमुख गंभीर जखमी; बार्शी येथील जगदाळे मामा रूग्णालयात उपचारासाठी दाखल

 

माय मराठी न्युज

शिवसेनेच्या संपर्क अभियानाच्या बॅनरवर फोटो न लावल्याने उस्मानाबाद जिल्ह्यातील भुम, परांडा, वाशी या मतदार संघातील शिवसेनेच्या आजी-माजी आमदार समर्थकांमध्ये जोरदार मारामारी झाली आहे. बॅनरवर फोटो न लावल्यामुळे शिवसैनिक आपआपसात भिडले. या मारामारीत परांडा शिवसेनेचे तालुका प्रमुख अण्णा जाधव हे गंभीर जखमी झाले आहेत.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून हे संपर्क अभियान सुरू आहे. यात सर्वसामान्यांचे प्रश्न आणि विशेषत: शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यावर भर दिला जात आहे. शिवसेनेचे हे संपर्क अभियान सध्या संपुर्ण महाराष्ट्रात सुरू असून सध्या तालुका पातळीवर आयोजित करण्यात आले आहे.

शिवसेनेतील जुना वाद चव्हाट्यावर

उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा विधानसभा मतदासंघांतील आजी- माजी आमदारांच्या समर्थकानी आपापसात मारामारी केली आहे. शिवसेनेच्या संपर्क अभियानाच्या बॅनरवर माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचा फोटो न लावल्याने हा वाद झाला असल्याचे बोलले जात आहे. या वादामुळे पुन्हा एकदा माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील आणि विद्यमान आमदार डॉ. तानाजी सावंत यांच्यातील जुना वाद चव्हाट्यावर आला आहे.

शिवसेना तालुका प्रमुख जखमी

यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख अण्णा जाधव यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला असून यात २५ जणांनी लाठ्या, काठ्या, बाटल्या घेऊन हा हल्ला केल्याचे बोललं जात आहे. या मारामारीत परांडा शिवसेना तालुकाप्रमुख अण्णा जाधव हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर बार्शी येथील जगदाळे मामा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र अद्याप याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close