-->
राजकियसामाजिक

टेंभुर्णी येथे विनापरवाना आंदोलन केल्याप्रकरणी अतुल खुपसे यांच्यावर गुन्हा दाखल

विनापरवाना आंदोलन व जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी अतुल खूपसे पाटिलसह इतर ६ लोकांविरुद्ध टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल

 

 

माय मराठी न्युज प्रतिनिधी

दिनांक १९/०७/२०२१ रोजी टेंभुर्णी बस स्टँड समोर जुन्या पुणे सोलापूर हायवे रोडवर ५:०० वाजण्याच्या सुमारास पावसाने पडलेल्या खड्ड्यात विनापरवाना रोडवर वाहने थांबवून ठेवत, विनापरवाना वृक्षारोपण करून व घोषणाबाजी देऊन माननीय जिल्हाधिकारी सो यांनी पारित केलेल्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी १) अतुल खुपसे, उपळवाटे ता. माढा २) अमोल जगदाळे, अकलूज ता. माळशिरस ३) विठ्ठल मस्के, शेवरे ता. माढा व इतर ४ ते ५ अनोळखी लोकांविरुद्ध टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथे पोलीस नाईक पोपट तुषार गाडे यांनी वरील लोकांविरुद्ध माननीय जिल्हाधिकारी सो यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी भादवि कलम ३४१, २७०, १८८ कलम महा.पे.आधी.१३५ साथीचे रोग अधिनियम कायदा १८९७ चे कलम ३, ४ आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ (ब) प्रमाणे टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका अर्थानी विचार केला तर टेभूर्णी हे गाव माढा तालुक्यातील शेतकऱ्याची प्रमुख बाजारपेठ म्हणून ओळखले जाते. या बसस्टॅड समोरील खड्ड्यांचा जनतेबरोबर प्रशासकीय अधिकार्यांना पण त्रास होत होता. पोलिस गाडीची नाईट राउन्ड आणि आरोपींची ने-आण करण्यासाठी सुध्दा हाच प्रमुख रस्ता आहे. परंतु सत्ता सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आवाज ऊठवणारे नेतृत्व म्हणून खुपसे पाटील यांच्याकडे पाहिले जाते. उजणीच्या ५ टी एम सी पाणी वाचवण्यासाठी पालकमंत्री आणि शासणाला नमती भूमिका घेऊन आदेश रद्दचा निर्णय घ्यायला भाग पाडणारे तसेच शेतकर्याच्या नावावर विनापरवाना बोगस कर्ज काढणाऱ्या कारखानदारांना जेरीस आणणारे म्हणजे कायम शेतकऱ्याच्या बाजूने सरकारच्या विरोधात आसूड ओढणारे म्हणून ओळख आसणारे खुपसे पाटील यांच्यावर फक्त प्रस्थापितांच्या दबावापोटी गुन्हा दाखल केला आहे काय? अशी चर्चा जनमानसातून ऐकण्यास मिळत आहे. आंदोलने अथवा मोर्चे काढू नये असे आवाहन टेंभुर्णीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांनी केले आहे.

सरकार विरोधी आंदोलनामुळे मला टारगेट करूनच सरकार गुन्हे दाखल करत आहे. सत्तेतील मंत्री आणि आमदांराच्या कार्यक्रमात गर्दी चालते. परवा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सोलापुरात आले तेथे गर्दी झाली तरी तिथे गुन्हा दाखल होत नाहीत. परंतु आम्ही कमीत कमी लोक घेऊन गांधीगीरी मार्गाने आंदोलन केले तरी पण गुन्हे दाखल होतात. सरकार शेतकरी विरोधी असल्याने शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्याचा आवाज दाबण्यासाठी गुन्हे दाखल केले जातात ही दुर्देवी बाब आहे.

अतुल खुपसे पाटिल

जनशक्ती शेतकरी संघटना प्रमुख

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close