-->
राज्यविशेष

भीषण अपघात: प्रवाशी जीप दरीत कोसळून आठ जणांचा मृत्यू

 

माय मराठी न्युज

नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ भागात सिंदी दिगर घाटात प्रवासी वाहतूक करणारी जीप कोसळल्याने ८ प्रवाशांचा मृत्यू झाला असुन १५ प्रवाशी गंभीर रित्या जखमी झाले आहेत. या जीप मध्ये एकूण ३० प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरु असून हा भाग अतिशय दुर्गम असल्याने बचावकार्यात अडचणी येत आहेत. जखमीं प्रवाशांना तातडीने उपलब्ध खाजगी रुग्णालयात दाखल केले जात आहे.

हा अपघात सायंकाळी सिंदी दिगर घाटात घडला आहे. प्रवासी वाहतूक करणारी खासगी जीप सायंकाळी प्रवाशांना घेऊन जात असताना या घाटात कोसळली. या जीप मध्ये ३० प्रवासी होते. जीप घाटात कोसळत असताना काही प्रवाशांनी बाहेर उड्या मारल्याने तेही जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की, दरीत जीप कोसळून जीपचा चुरडा झाला आहे. अपघातात ८ जण मृत्यू मुखी झाले आहेत तर १५ पेक्षा अधिक प्रवासी गंभीररीत्या जखमी झाले आहेत. अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्थानिक लोकांच्या सहकार्याने घटनास्थळी बचावकार्य युद्धपातळीवर सुरु असून अनेक वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.

या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शोक व्यक्त करण्यात आला आहे. मृतांच्या नातेवाईकांना २ लाखाची तर जखमी झालेल्यांच्या नातेवाईकांना ५० हजार रुपयांची मदत केंद्र सरकार कडून जाहीर करण्यात आली आहे.©wd

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close