-->
आरोग्यदेश

देशातील पहिली कोरोना रुग्ण पुन्हा कोरोनाच्या विळख्यात

 

माय मराठी न्युज

देशातील पहिली कोरोना बाधित रुग्ण असलेल्या वैद्यकीय विद्यार्थिनीला पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली असल्याबाबतची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे.

 

देशातील पहिली कोरोना रुग्ण ही वैद्यकीय विद्यार्थिनी होती. कोरोनाबाधित विद्यार्थिनी ही चीनमधील वुहान विद्यापीठात वैद्यकीय शिक्षण घेत होती. ती सुट्ट्यांमध्ये गेल्यावर्षी चीनहून भारतात आली होती. त्यानंतर तिला ३० जानेवारी २०२० रोजी कोरोनाची लागण झाल्याचे आढळले होते. या विद्यार्थिनीने केरळ मधील थिस्सूर मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये तीन आठवडे उपचार घेतले होते. त्यानंतर तिची दोनदा कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. तब्येत बरी झाल्यानंतर तिला २० फेब्रुवारी २०२० रोजी रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली होती.

 

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थिनीला पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. तिची पीसीआर टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे तर अँटीजेन टेस्ट निगेटिव्ह आली आहे. तिला कोरोनाची सौम्य लक्षणे असल्याचे थिस्सूरचे डीएमओ डॉ. के. आर. जीना यांनी प्रसार माध्यमांना सांगितले आहे. या वैद्यकीय विद्यार्थिनीच्या स्वॅबचे नमुने गोळा करण्यात आले आहेत. ही विद्यार्थिनी अभ्यासाची तयारी करण्यासाठी दिल्लीला निघाली होती म्हणून तिची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. मात्र, आरटी-पीसीआर टेस्ट पॉझिटिव्ह आली असल्याने कोरोनाबाधित विद्यार्थिनी ही घरी असून तिची तब्येत स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close