पुणे : प्रतिनिधी
तरुणांची शक्ती समाजहितासाठी उपयोगात आणण्यासाठी व्यक्तिव्यक्तींमध्ये आणि व्यक्ती व समाज यांमध्ये सुसंवाद व समतोल साधावा लागतो. म्हणजेच सामाजिक स्थैर्य प्रस्थापित होऊन प्रगती होते. तरुणपिढी चंगळवादाऐवजी समाजसेवेसारख्या विधायक कार्याकडे वळण्यास या स्तुत्य उपक्रममुळे नक्कीच मदत होईल असे प्रतिपादन पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदिपदादा विद्याधर कंद यांनी केले.
लोणीकंद, ता . हवेली येथे स्व . पै . सचिन नानासाहेब शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खडकआळी मित्र मंडळ व लोणीकंद ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबीराच्या शुभारंभ प्रसंगी पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदिपदादा कंद बोलत होते. नानासाहेब बाबुराव शिंदे, खडकआळी मित्र मंडळ व संपूर्ण मित्र परिवार तसेच के ई एम हाॅस्पीटल पुणे संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात 150 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी रक्तदान केलेल्या रक्तदात्यांना अल्पोपहार व प्रशस्तीपत्र देण्यात आले.
प्रदिपदादा कंद पुढे म्हणाले की, राज्यात व देशात कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक रुग्णांना रक्ताची गरज भासत आहे. या पार्श्वभूमीवर स्व पै सचिन नानासाहेब शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त खडकआळी मित्र मंडळ व के ई एम हाॅस्पीटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिर हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे.
यावेळी सरपंच सागर गायकवाड, माजी उपसरपंच रविंद्र कंद, योगेश झुरुंगे, सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब शिंदे, पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा उपाध्यक्ष स्वप्निल कंद, हवेली तालुका शिवसेना प्रमुख सागर झुरुंगे, शालेय व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष जय कंद, डाॅ संपत शिंदे, उद्योजक नितीन कंद माऊली कंद, अमोल कंद, सुदर्शन तोडकर, सागर बबन कंद, अंदाज शिंदे, किरण मनोहर शिंदे, सुधीर शिंदे, संतोष मनोहर शिंदे, विजय वाळुंज, माऊली कोलते, सौरभ कंद, निखिल जगताप, विशाल शिंदे, प्रसाद गायकवाड, अनिल शिंदे, संजय शिंदे, आशुतोष शिंदे, के ई एम हाॅस्पीटल पुणे येथील डाॅ. अमीत पीसे, एम ओ डाॅ. अवधुत नरसाळे, एम ओ किशोर धुमाळ, पी आर ओ टेक्नीकल सुपरवायझर सविता सावंत, सुवर्णा हिंगे, सुनिल पुंड, संदिप काळे, पुनम नेवसे, परिचारिका लिशा भोसले, जयश्री धवन, मंगेश वाघमारे, गणेश तांबे, रेणुका गाजुल, स्वाती पापळ सर्व डाॅक्टर्स परिचारिका स्टाप तसेच संपूर्ण पुणे जिल्ह्यातील तरुण कार्यकर्ते या शिबीरासाठी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रम प्रसंगी खडकआळी मित्र मंडळाचे अध्यक्ष स्वप्निल रामचंद्र कंद यांनी प्रमुख मान्यवरांचे तसेच रक्तदात्यांचे स्वागत केले व शेवटी सर्वांचे आभार व्यक्त केले.





