भैरवनाथ विविध कार्यकारी विकास सोसायटीच्या चेअरमनपदी रघुनाथ तात्या तापकीर यांची बिनविरोध निवड
कोरेगाव भीमा प्रतिनिधी/गजानन गव्हाणे पाटील


लोणीकंद ता. हवेली येथील भैरवनाथ विविध कार्यकारी विकास सोसायटीचे चेअरमनपदी सोमेश्वर पतसंस्थेचे माजी चेअरमन रघुनाथ तात्या तापकीर यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली. विद्यमान चेअरमन रघुनाथ आप्पा कंद यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या चेअरमन पदासाठी निवडणूक घेण्यात आली. पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदिपदादा विद्याधर कंद व हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती नारायणराव कंद यांच्या मार्गदर्शनाखाली चेअरमन पदाची निवड बिनविरोध करण्यात आली. सर्व प्रक्रिया पूर्ण करुन चेअरमन रघुनाथ आप्पा कंद यांनी चेअरमन पदाचा पदभार नवनिर्वाचित चेअरमन रघुनाथ तात्या तापकीर यांच्याकडे सोपावला. कार्यक्रम प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी अभिनंदनाचा वर्षाव करीत अभिनंदन केले.
यावेळी हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती नारायणराव कंद, माजी आदर्श सरपंच श्रीकांत कंद, माजी उपसरपंच व तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष संजय कंद, सोमेश्वर पतसंस्थेचे चेअरमन सुर्यकांत मोरे, माजी चेअरमन जनार्दन वाळुंज, भैरवनाथ विविध कार्यकारी विकास सोसायटी चे माजी व्हा. चेअरमन गुलाबराव कंद, सोमेश्वर पतसंस्थेचे संचालक शहाजी शिंदे, माजी संचालक सुभाष कंद, शालेय व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष जय कंद, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर कंद संपत कंद, दत्तात्रय कंद, गोपीनाथ इंगळे, बाबुराव आव्हाळे, दिनकर दहिफळे, तानाजी देवकुळे, युवा उद्योजक अमोल कंद, उत्तम झुरुंगे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
चेअरमन पदाच्या कार्यकाळात लोणीकंद येथील शेतकरी बांधवांसाठी शासनाच्या वतीने जाहीर होणाऱ्या विविध योजना प्रत्येक सभासदा पर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करणार असून सभासदांना संस्थेच्या माध्यमातून अल्प दरात जास्तीत जास्त कर्जपुरवठा करून कोरोना काळात शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी पावले उचलणार असल्याचे नवनिर्वाचित चेअरमन रघुनाथ तात्या तापकीर यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले.




