-->
राजकियराज्यसामाजिक

भाजपाच्या वतीने वाघोली येथील केसनंद रोडवर रास्ता रोको आंदोलन

रस्त्यातील खड्ड्यात झाड लावून नोंदविला निषेध

 

 

 

 

कोरेगाव भीमा प्रतिनिधी/गजानन गव्हाणे पाटील

वाघोली (ता:हवेली) ते केसनंद रस्त्याची अतिशय दयनीय दुरावस्था झाली असून रस्त्याला मोठ मोठे खड्डे पडले आहेत. वाहनचालकाना खड्याचा अंदाज येत नसल्याने छोटे मोठे अपघात होऊन निरापराध नागरिकांचे अपघातामध्ये जाणारे बळी थांबवण्यासाठी तसेच प्रशासनाची कुंभकर्ण झोप उडविण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने वाघोली येथील केसनंद रोडवर रस्त्यातील खड्ड्यात झाडे लावून रास्ता रोको आंदोलन केले.

वाघोली केसनंद रस्त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर करून निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन अनेक महिने झाले आहे. या रस्त्याचे शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन देखील झाले आहे. परंतु आज पर्यंत रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली नसल्याने वाघोली परिसरातील नागरिकांसह महिलांंनी रस्ता रोको आंदोलन करत प्रशासनाचा निषेध केला गेला. येणाऱ्या आठ दिवसात या रस्त्याचे काम सुरू झाले नाही तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला.

 

सार्वजनिक बांधकाम विभागाने वाघोली केसनंद रस्त्यासाठी 3 कोटी निधी मंजूर करून निवीदा प्रक्रिया पूर्ण होऊन अनेक महिने झाले. परंतु अजूनही रस्त्याचे काम चालू झाले नाही आजचे आंदोलन हे फक्त इशारा आहे आठ दिवसात काम चालू झाले नाही तर सा. बा. वि. कार्यालयावर तीव्र आंदोलन करणार याची सर्व जबाबदारी प्रशासनाची असेल.

संदीप सातव ,भाजपा युवा मोर्चा संघटक,सरचिटणीस

यावेळी भाजपचे संघटन सरचिटणीस संदीप सातव, भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारणी सदस्य गणेश कुटे, पंचायत समिती सदस्य श्याम गावडे, भाजपा विद्यार्थी आघाडीचे पुणे जिल्हा अध्यक्ष अमोल शिवले, गणेश सातव, सुनिता आढाव, पूजा बहिरट, नम्रता बहिरट, रेणुका झेंडे, राधा झेंडे, पुष्पा पवार, प्रमिला तडस, प्रणाली तडस, गायत्री जगताप, गजरा तुरकुंडे, चंद्रकला तुरकुंडे, राधा चव्हाण, मथुरा जगताप यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच लोणीकंद पोलिसांच्या वतीने कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close