कोरेगाव भीमा प्रतिनिधी/गजानन गव्हाणे पाटील


लोणीकंद, ता. हवेली येथील उपसरपंच पदी नुकतीच शैलजा ज्ञानेश्वर कंद यांची बिनविरोध निवड करण्यात आली. विद्यमान उपसरपंच अश्विनी संतोष झुरुंगे यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच सागर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली. यावेळी कंद यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने त्यांची निवड करण्यात आली. सचिव म्हणून ग्रामविकास अधिकारी जालिंदर बोरावणे यांनी काम पाहिले.
नियुक्ती बिनविरोध करण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदिप कंद, माजी उपसभापती नारायण कंद तसेच ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले.
यावेळी माजी सरपंच लक्ष्मी कंद, लिना कंद, माजी उपसरपंच संजय कंद, रविंद्र कंद, योगेश झुरुंगे, शितल कंद, रामदास ढगे, संतोष लोखंडे, ग्रामपंचायत सदस्य सोहम शिंदे, रुपेश गावडे, मंदा कंद, सुरेखा होले, पुजा खलसे, जयश्री झुरुंगे, संगिता शिंदे, माजी ग्रामपंचायत सदस्य रामभाऊ कंद, भैरवनाथ विविध कार्यकारी विकास सोसायटीचे व्हा चेअरमन रघुनाथ तापकीर, संचालक गुलाबराव कंद, रविंद्र शिंदे, सोमेश्वर स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष मोहन तापकीर, सोमेश्वर महिला पतसंस्थेच्या व्हा चेअरमन आशा गरूड, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पुणे जिल्हा उपाध्यक्ष स्वप्निल कंद, हवेली तालुका भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीचे अध्यक्ष संतोष झुरुंगे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जय कंद, सामाजिक कार्यकर्ते दादा लोखंडे, किरण होले, गणेश झुरुंगे, विजय भोसकर, रामदास बिरदवडे, राहुल गायकवाड, नितीन कंद, हेमंत कंद, अजय गरुड, ओंकार कंद, दिनेश कंद, सागर कंद, शिवम गरूड, अनिकेत कंद, गणेश कंद, प्रविण शेळके, प्रथमेश साबळे, सौरभ वाळुंज, निलेश काळे, शुभम कंद, विराज कंद आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच शैलजा कंद यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, माझ्या सारख्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील गृहीणीला प्रदिपदादा कंद व नारायणराव कंद यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतमध्ये काम करण्याची संधी दिली याबद्दल मी मनापासून या उभयतांचे माझ्या सहका-यांचे आभार व्यक्त करुन धन्यवाद देते. मिळालेल्या संधीचे सोने करण्याची व जी जबाबदारी नेतृत्वाने विश्वासाने दिली आहे त्याला अतिशय गांभीर्याने व जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे सर्वांच्या सहकार्याने व विश्वासार्हता जपत पार पाडण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न मी करणार असल्याचे प्रतिपादन यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच शैलजा कंद यांनी केले. यावेळी त्यांचा गावाच्या वतीने सन्मान करण्यात आला.



