कोरेगाव भीमा प्रतिनिधी:गजानन गव्हाणे पाटील


शिरूर तालुक्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी भरीव काम करणार असल्याचे नवनियुक्त शिरूर तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रियंका बंडगर यांनी महिला अध्यक्ष नियुक्ती नंतर बोलताना सांगितले. तसेच महिला बचत गट, तरुण युवती यांच्या बरोबर कष्टकरी, मजूर महिला, विद्यार्थी शेतकरी यांचे प्रश्न अभ्यासपूर्ण सोडविण्यासाठी प्रयत्न करून शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहचवण्याचे काम करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
शिरूर तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी प्रियंका बंडगर यांची नुकतीच काँग्रेस भवन पुणे येथे पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष संजय जगताप आणि पुणे जिल्ह्याच्या महिला अध्यक्षा सीमा सावंत यांनी शिरूर तालुक्यामध्ये काम करण्याची जबाबदारी बंडगर यांना दिली.
यावेळी पुणे जिल्हा काँग्रेसचे खजिनदार महेश ढमढेरे, तालुका अध्यक्ष वैभव यादव, पर्यावरण विभागाचे अध्यक्ष उमेश काळे, शहर युवक अध्यक्ष अमजद पठाण, उपाध्यक्ष कार्तिक बाळसराफ, ज्योती हंडे,शीतल आनंदे, अरुणा मोहोळ, सचिन पंडित यावेळी उपस्थित होते.



