कोरेगाव भीमा प्रतिनिधी/गजानन गव्हाणे पाटील


लोणीकंद, ता. हवेली येथील स्टफ इंडिया प्रा. लि. या कंपनीच्या सीएसआर निधीतून पेरणे प्राथमिक आरोग्य केंद्राला अत्याधुनिक सर्व सुविधांयुक्त खोलीचे लोकार्पण माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, पंचायत समितीचे माजी उपसभापती माऊली वाळके, माजी सदस्य सुभाष जगताप तसेच कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन चिरमुरे आदींच्या हस्ते करण्यात आले.
व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा 👇🏻👇🏻👇🏻👇🏻
यावेळी सरपंच रुपेश ठोंबरे, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नीलिमा इनामदार, डॉ. प्रियांका सातव, पंचायत समितीच्या सदस्या संजीवनी कापरे, कंपनीचे व्यवस्थापक अनंता खंडागळे, अरुण चौधरी, चंद्रकांत शिंदे आदी अधिकारी, पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

स्टफ इंडिया कंपनीच्या वतीने अत्याधुनिक खोली बरोबर सॅनिटायझर मशीन, फेस मास्कशिल्ड, मास्क, सॅनिटायझर आदी वस्तू आरोग्य केंद्राला भेट म्हणून देण्यात आल्या. कंपनीच्या सीएसआर निधीतून सदर उपक्रम राबविल्याबद्दल प्रदीप कंद, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रोहिदास उंद्रे आदींनी या उपक्रमाचे अभिनंदन केले. या उपक्रमाचे नियोजन स्टफ इंडियाचे अरुण चौधरी, संगमेश्वर हॉटेलचे सुनील कवडे यांनी केले.




