-->
करमाळाराजकिय

विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस अतुल खूपसे-पाटील यांची भेट

शेतकर्‍यांच्या कर्जासंबंधी विधानसभेत प्रश्न उपस्थित करणार...देवेंद्र फडणवीस

करमाळा प्रतिनिधी/

करमाळा माढा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नावावर पंजाब नॅशनल बँकेकडून आमदार संजय शिंदे यांच्या म्हैसगाव येथील विठ्ठल कार्पोरेशन कारखान्याने परस्पर घेतलेल्या 22 कोटी 11 लाख रुपयांच्या कर्जा संबंधी विधानसभेत प्रश्न उपस्थित करू असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष अतुल खूपसे पाटील यांना आश्वासन दिले .अतुल खूपसे पाटील यांनी मुंबईत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना या प्रश्नासंबंधी निवेदन दिले.यावेळी खुपसे पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा करून फडणवीस यांनी प्रश्नासंबंधी माहिती घेतली.आणी शेतकर्‍यांना न्याय मीळवून देण्याचे अभिवचन दीले. अतुल खुपसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील पंजाब नॅशनल बॅंकेच्या मुख्यालयासमोर शेतकर्‍यांचे आंदोलन झाले.त्यामुळे शेतकर्‍यांच्या नावावर परस्पर कर्ज काढण्याचे प्रकरण राज्यभर गाजले.या कर्जप्रकरणात पंजाब नॅशनल बॅंकेचे अधिकारी व विठ्ठल कार्पोरेशनचे चेअरमन आमदार संजय शींदे यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी.शेतकर्‍यांच्या नावावर कर्ज असल्यामुळे ईतर बॅंका त्यांना कर्ज देत नाहीत.त्यामुळे शेतकरी हतबल झाले असून भविष्यात असे प्रकार घडू नयेत म्हणूम पावले उचलावीत असेही अतुल खुपसे पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.माजी जलसंपदामंत्री गीरीश महाजन यांचीही भेट घेऊन खुपसे पाटील यांनी शेतकर्‍यांच्या प्रश्नांसंदर्भात चर्चा केली.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close