-->
आरोग्यकरमाळाराजकियराज्यसामाजिक

तालुक्यातील रुग्णांचे प्रश्न सोडविण्यासाठी शिवसैनिकांनी प्रयत्न करावेत; वैद्यकीय मदत कक्षप्रमुख मंगेश चिवटे यांचे आवाहन

करमाळा युवा सेनेकडून शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कक्षप्रमुख मंगेश चिवटे यांचा सत्कार

 

करमाळा प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

शिवसेनेचे ब्रीदवाक्य ८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण हे आहे आणि तेच ब्रीदवाक्य डोळ्यासमोर ठेवून शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे काम सुरू आहे. करमाळा तालुक्यातील रुग्णांचे प्रश्न सोडविण्यासाठी शिवसैनिकांनी प्रयत्न करावेत असे आव्हान शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी केले. युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख मयुर यादव शहर प्रमुख विशाल गायकवाड बाळासाहेब कटारिया आदी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगेश चिवटे यांचा आंब्याच्या झाडाचे रोप देऊन सत्कार केला. कोरोना काळात रुग्णसेवा केल्याबद्दल मयुर यादव, विशाल गायकवाड, आदी पदाधिकाऱ्यांचा ही यावेळी सत्कार करण्यात आला.

 

यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, शिवसेनेचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे काम संपूर्ण महाराष्ट्रभर पसरत असून शिवसेना नेते एकनाथ शिंदे व डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून तालुका पातळीपर्यंत हे काम पोहोचविण्यात येत आहे. करमाळा तालुक्यातील कोणत्याही रुग्णांना काही समस्या असेल तर त्यांनी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष करमाळा शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन केले. शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने करमाळा तालुक्यासाठी एक अद्यावत रुग्णवाहिका देण्यात आली असून ऑक्सीजन मशीन देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर कोरोना रुग्णांना इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात आले. त्याचबरोबर गोरगरीब गरजू रुग्णांवर मोठ्या शस्त्रक्रिया करण्याची गरज भासल्यास शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष मदत करत आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close