करमाळा प्रतिनिधी


करमाळा शहरातील रस्त्याचे काम हे पावसात देखील चालू आहे, त्यामुळे ते निकृष्ट दर्जाचे होत आहे.तरी शहरातील सर्व कामे थांबवावीत अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे यांनी केली आहे.
शहरातील बहुतांश रस्ते अत्यंत खराब झालेले आहेत संगम चौक ते गायकवाड चौक,पोथरे नाक्या जवळील जुना बायपास, गायकवाड चौक ते सारंगकर हाँस्पिटल रोड आदी ठिकाणी कामे चालू आहेत, काही दिवसांपूर्वी व आज झालेल्या पावसामुळे खड्यात पाणीच पाणी साचले आहे. त्यामुळे निकृष्ट दर्जाचे काम होत आहे.
वरील रस्त्यवर तसेच परिसरात हमेशा वर्दळ असते, संगम चौकातील रस्त्यावरून रोशेवाडी, वीट, पुण्याकडे जाणारे तसेच छञपती शिवाजी महाराज पुतळया पासून नगरकडे जाणारे मोठ्या बसेस, चार चाकी, दुचाकी सारख्या वाहत असतात या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे एक मोठे वाहन गेले तर मागील दुचाकीस्वरास त्रास होत आहे. पाऊस पडल्यामुळे पाणी अंगावर उडून या भागात वारंवार अपघात होत आहेत. या रस्त्यावरून वयोवृद्ध सायकल वरून जाताना यांना खड्डे चुकवावे लागत आहे खड्डे चुकवताना वारंवार अपघात झालेले आहेत. यामुळे महिला वयोवृद्ध नागरिकांना जिव मुठीत धरून जावे लागत आहे. गायकवाड चौक, टाऊन हाँल चौक, रंभापुरा रस्ता अत्यंत खराब आहे. या रस्त्यावर जिव मुठीत धरून नागरिकांना जावे लागत आहे. रस्त्यावर खड्डे आहेत का खड्यावर रस्त्याचे काम चालू आहे का पाण्याचे डबके हे लक्षात येत नाही तरी हा रस्ता पावसाळा संपल्यावर दुरूस्त करावा.अन्यथा भारतीय जनता पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा रामभाऊ ढाणे यांनी दिला आहे.




