-->
करमाळासामाजिक

घारगाव येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त दलितवस्ती समाजमंदिराचे उद्घाटन

 

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

 

करमाळा तालुक्यातील मौजे घारगाव येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती दिनाचे औचित्य साधून दलित वस्ती समाज मंदिराचे उद्घाटन API राहुल पाटील साहेब व माजी सरपंच रामलींग आणा देशमुखे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सर्वधर्मसमभाव या भावनेतून समाजमंदिरामध्ये श्री. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, अण्णाभाऊ साठे या महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करून सर्व समाजाच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. त्यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

 

 

यावेळी माजी सरपंच किरण दादा पाटील, विद्यमान सरपंच राजेंद्र भोसले, उपसरपंच सतीश पवार, ग्रामपंचायत सदस्य श्री. संजय सरवदे, दत्ता मस्तूद, हौसराव गायकवाड, प्रदिप डिसले, जिवन होगले, नितीन पाटील सर, प्रवीण होगले, देविदास सरवदे, विक्रम पाटील, दादा पाटील, भारत पाटील, सुरेश होगले, मोहन होगले, हनुमंत गायकवाड, राज केसकर, बिभीषण कात्रजकर, तात्याराम गायकवाड, ग्रामसेवक गणपत केसकर, ब्रह्मदेव काळे, लक्ष्मण पवार, नवनाथ देशमूखे, सचिन पवार, बुवासाहेब डिसले, चिमण शिंगटे, मोतीलाल काळे, सीताराम काळे, देविदास होगले, देविदास होगले, राजेंद्र होगले, सतीश अडसूळ, पिंटू अडसूळ, भारत अडसूळ, तुकाराम काळे, ईश्वर काळे तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close