
प्रतिनिधी l करमाळा (माय मराठी न्यूज)


रावगाव (ता. करमाळा) येथील राजीव गांधी सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने छत्रपती संभाजीराजे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी छत्रपती संभाजीराजे यांच्या प्रतिमेचे पूजन नूतन केंद्रप्रमुख कैलास आवटे तसेच जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा रावगाव येथील सहशिक्षक माधव फुंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
मराठी नवीन वर्ष आणि गुढीपाडव्याचे औचित्य साधून वाचनालयाच्या वतीने स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त नवीन पुस्तकांची ग्रंथगुढी उभारण्यात आली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी दर्जेदार पुस्तके उपलब्ध होणार असून वाचन संस्कृतीला चालना मिळणार आहे.
या कार्यक्रमास रामदास फुंदे, रामदास नलवडे, राहुल गोसावी, राजेंद्र बुधवंत, राहुल पवार, प्रकाश कांबळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थितांनी छत्रपती संभाजीराजे यांच्या शौर्यपूर्ण इतिहासाचे स्मरण करत त्यांच्या कार्याला अभिवादन केले. शेवटी उपस्थितांचे आभार वाचनालयाचे सचिव भास्कर पवार यांनी मानले.



