-->
करमाळाविशेष

कॉसमॉस बँकेचे चेअरमन ॲड. प्रल्हाद (बापू) कोकरे यांचा ‘खातगाव-रत्न’ पुरस्काराने सन्मान

 

प्रतिनिधी l करमाळा (माय मराठी न्यूज)

 

करमाळा तालुक्यातील खातगाव येथील सुपुत्र तथा कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन ॲड. प्रल्हाद (बापू) भिमराव कोकरे यांचा ग्रामस्थांच्या वतीने ‘खातगाव-रत्न’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. सहकार, बँकिंग, कायदा आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत खातगाव ग्रामस्थांकडून हा गौरव करण्यात येत आहे.

 

खातगावसारख्या ग्रामीण भागातून शिक्षण घेऊन पुढे मोठ्या पदापर्यंत पोहोचलेल्या कोकरे यांनी आपल्या कष्ट, प्रामाणिकपणा आणि दूरदृष्टीच्या जोरावर सहकार क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे. कृषी पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करून सहकार खात्यात प्रवेश केला. पुढे असिस्टंट रजिस्ट्रार, जिल्हा उपनिबंधक आणि जॉइंट रजिस्ट्रार सहकारी संस्था अशा महत्त्वाच्या पदांवर त्यांनी जबाबदारी सांभाळली.

 

आपल्या सेवाकाळात त्यांनी अनेक सहकारी संस्था सक्षम करण्यासाठी काम केले. तरुणांना बँकिंग, सरकारी व इतर क्षेत्रात नोकरी मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन केले, तसेच व्यवसायासाठी प्रोत्साहनही दिले. त्यांच्या कार्यकाळात टाकळी (ता.करमाळा) येथे बँकेची शाखा सुरू करण्यात आली तसेच त्यांनी खातगावमध्ये ही विविध कार्यकारी विकास सोसायटीची स्थापना करण्यात आली.

 

सन २००४ पासून ते कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळावर कार्यरत आहेत. अनेक वेळा बिनविरोध निवडून येत त्यांनी २०१९ ते २०२१ या काळात व्हाइस चेअरमन म्हणून काम केले. सध्या २०२४-२५ मध्ये त्यांची चेअरमनपदी एकमताने निवड झाली आहे.

 

या सन्मान सोहळ्याचे आयोजन शनिवार दि. २१ मार्च रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत खातगाव नं. १ येथे करण्यात आले आहे. ह.भ.प. गुरुवर्य आत्माराम महाराज कुटे (शास्त्री), आळंदी यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून त्यानंतर स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ॲड. रविंद्र कोकरे यांनी केले आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close