-->
करमाळा

वडगाव उत्तर येथे नारळाच्या झाडावर वीज कोसळली; क्षणार्धात झाडाने घेतला पेट

 

प्रतिनिधी l करमाळा (माय मराठी न्यूज)

 

करमाळा तालुक्यातील वडगाव उत्तर येथे बुधवारी (दि. १८ मार्च) रात्री साडेनऊच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह झालेल्या अवकाळी पावसात नारळाच्या झाडावर वीज पडून झाडाला आग लागल्याची घटना घडली.

 

मिळालेल्या माहितीनुसार, संध्या वसंत अंधारे यांच्या घरासमोरील नारळाच्या झाडावर अचानक वीज कोसळली. वीज पडताच झाडाच्या वरच्या भागातून ठिणग्या उडाल्या आणि काही क्षणात झाडाने पेट घेतला. रात्रीच्या अंधारात झाडातून निघणाऱ्या ज्वाळा स्पष्ट दिसत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

 

हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार करमाळा तालुक्यात अवकाळी पावसासह विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे वाहत होते. त्याच दरम्यान ही घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा इतर नुकसान झाले नाही.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close