
प्रतिनिधी l करमाळा (माय मराठी न्यूज)


महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये मौजे चांडगाव (ता. इंदापूर) ते पोमलवाडी (ता. करमाळा) दरम्यान उभारण्यात येणाऱ्या पुलासाठी ३४० कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर झाल्याबद्दल माननीय कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांची भेट घेऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
पंचायत समिती सदस्य ॲड. अजित विघ्ने यांच्या मार्गदर्शनाखाली ही भेट घेण्यात आली. यावेळी मंत्री दत्तामामा भरणे यांनी उपस्थितांशी संवाद साधत, “येत्या काळातही विकासकामांसाठी लागणारी भरीव मदत तसेच शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी जे काही करावे लागेल त्यासाठी कधीही हाक द्या. तुमच्या मताचा शंभर टक्के विचार केला जाईल,” असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी माजी सभापती बापूनाना पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य नवनाथशेठ राऊत, सरपंच सचिन वेळेकर, सदस्य प्रशांत नवले, रविंद्र विघ्ने, देलवडीचे सरपंच सुनील ढवळे, दौंड शुगरचे कृषी अधिकारी उदय खाटमोडे-पाटील, नितीन कोकणे, पंडीतराव माने, शाम ननवरे, जावेद शेख, दत्ता कोकणे, ओंकार गुलमर, ओम आटोळे, राजसिंह पाटील तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



