-->
करमाळामहिलाविषयक

महिला दिनानिमित्त नवभारत प्रतिष्ठानकडून कष्टकरी महिलांचा सन्मान

 

प्रतिनिधी l रावगाव (माय मराठी न्यूज)

 

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त नवभारत प्रतिष्ठान व राजीव गांधी सार्वजनिक वाचनालय, रावगाव यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात गावातील कष्टकरी व मजूर महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला.

 

यावेळी संस्थेच्या सचिवांच्या हस्ते कष्टकरी महिलांना सन्मानित करण्यात आले. तसेच शासनामार्फत सुरू असलेल्या एकल महिला सर्वेक्षणाबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. गावातील एकही एकल महिला या सर्वेक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन करण्यात आले.

 

याशिवाय महिलांसाठी शासनाच्या विविध योजनांची माहितीही देण्यात आली. कार्यक्रमाला गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. शेवटी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close