-->
करमाळाराजकिय

घरपट्टीवरील वाढीव व्याज तात्काळ रद्द करा; विरोधी पक्षाची ठाम मागणी

 

प्रतिनिधी l करमाळा (माय मराठी न्यूज)

 

करमाळा नगरपालिकेने प्रस्तावित केलेल्या घरपट्टीवरील वाढीव व्याजाविरोधात विरोधी पक्षाने जोरदार भूमिका घेतली आहे. ही वाढ मालमत्ता धारकांना आर्थिक भुर्दंड देणारी असून ती तात्काळ रद्द करण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रशांत ढाळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे.

 

माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेतील शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी मुख्याधिकारी सचिन तपसे यांची भेट घेत निवेदन सादर केले. घरपट्टीवरील वाढीव व्याजामुळे सर्वसामान्य नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक ताण येणार असल्याचे त्यांनी या निवेदनात म्हटले आहे.

 

सध्याच्या महागाईच्या परिस्थितीत सर्वसामान्य नागरिक आधीच अडचणीत असताना अशी वाढ करणे योग्य नसल्याचेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे मालमत्ता करावरील वाढीव व्याज माफ करून मालमत्ता धारकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करमाळा नगरपालिकेतील विरोधी पक्षाकडून करण्यात आली आहे.

 

यावेळी नगरसेवक युवराज चिवटे, अश्विनी कांबळे अब्दुले, सुवर्णा आलाट व साजेदा कुरेशी उपस्थित होते. करमाळा शहरातील नागरिकांमध्ये या निर्णयामुळे तीव्र नाराजी निर्माण झाली असल्यामुळे नगरपालिकेने याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा विरोधी पक्षाकडून यावेळी व्यक्त करण्यात आली आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close