-->
करमाळाराजकिय

सावडी ग्रामपंचायत गणेश भाऊ चिवटे यांच्या नेतृत्वाखाली ताकदीने लढणार – दत्तात्रय एकाड

 

प्रतिनिधी l करमाळा (माय मराठी न्यूज)

 

सावडी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने आणि पूर्ण ताकदीने निवडणूक लढवणार असल्याचा विश्वास दत्तात्रय एकाड यांनी व्यक्त केला आहे.

 

यावेळी पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, यंदाच्या निवडणुकीत विकास हा मुख्य मुद्दा असणार आहे. गावातील पाणीपुरवठा, अंतर्गत रस्ते, स्वच्छता, वीज व्यवस्था तसेच युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. “गावाच्या प्रगतीसाठी सक्षम आणि अनुभवी नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळे आम्ही गणेश भाऊ चिवटे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार आहोत. ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने विकासकामांच्या बळावर आम्ही विजय निश्चित करू.”

 

गावातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी ठोस नियोजन करण्यात येत असून, सर्व समाजघटकांना सोबत घेऊन पारदर्शक आणि जनतेला उत्तरदायी कारभार करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, सावडी गावात निवडणुकीची चर्चा रंगू लागली असून विविध पॅनलांनी हालचालींना वेग दिला आहे. त्यामुळे सावडी ग्रामपंचायत निवडणूक यंदा चुरशीची होण्याची चिन्हे दिसत आहेत.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close