-->
करमाळाविशेष

वाशिंबेतील गावकऱ्यांच्या पाठपुराव्याला यश; ग्रामदैवताच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी

सौर ऊर्जा प्रकल्प सुरू राहणार; मात्र मंदिराकडे जाणारा मार्ग कायम खुला

 

प्रतिनिधी l वाशिंबे (माय मराठी न्यूज)

 

वाशिंबे (ता. करमाळा) येथील ग्रामदैवत भैरवनाथ मंदिराकडे जाणारा मुख्य रस्ता सौर ऊर्जा प्रकल्पाच्या उभारणीदरम्यान बंद होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र गावकऱ्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि गणेश भाऊ चिवटे यांच्या प्रयत्नांमुळे अखेर हा रस्ता गावकऱ्यांच्या वहिवाटीसाठी खुला ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

सदर रस्ता बंद झाल्यास ग्रामदैवताच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना मोठा अडथळा निर्माण झाला असता. तसेच धार्मिक कार्यक्रम, यात्रा आणि पारंपरिक सोहळ्यांवरही त्याचा परिणाम झाला असता. ही बाब लक्षात घेऊन गणेश चिवटे यांनी संबंधित प्रशासन आणि सौर ऊर्जा प्रकल्प व्यवस्थापनाशी सातत्याने संवाद साधून पाठपुरावा केला.

 

गावकऱ्यांच्या भावना आणि धार्मिक परंपरेचा मान राखत प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेतला. त्यामुळे सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम सुरू राहणार असले तरी मंदिराकडे जाणारा मार्ग कायमस्वरूपी खुला ठेवण्यात येणार आहे. या निर्णयामुळे वाशिंबे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून गणेश चिवटे यांच्या प्रयत्नांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close