
करमाळा | प्रतिनिधी (माय मराठी न्यूज)


दि. १६ जानेवारी २०२६ रोजी महाराष्ट्रातील मुंबई, सोलापूरसह राज्यातील सर्व महानगरपालिकांमध्ये भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या ऐतिहासिक यशाबद्दल करमाळा येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
विद्यानगर येथील मध्यवर्ती भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात हा जल्लोष आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मिळालेल्या या घवघवीत यशाबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षा रश्मीदीदी बागल, भाजपाचे युवा नेते दिग्विजय बागल, करमाळा ग्रामीण मंडल अध्यक्ष सचिन पिसाळ, संचालक सतीश बापू निळ, कल्याण सरडे, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शुभम बंडगर, रेवणनाथ निकत, स्वप्निल गोडगे, वांगी सोसायटीचे माजी चेअरमन डॉ. विजय रोकडे, महादेव गायकवाड, प्रदीप वाघमोडे तसेच उंदरगाव येथील सरपंच व सरचिटणीस युवराज मगर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. तसेच फटाक्यांची आतषबाजी करून भाजपाच्या विजयाचा जल्लोष करण्यात आला.




