-->
करमाळाराजकिय

विकासकामांमुळे वीट जि.प. गटात भाजपाला मिळणार जनतेचा कौल – काकासाहेब सरडे

 

करमाळा | प्रतिनिधी (माय मराठी न्यूज)

 

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर करमाळा तालुक्यातील वीट जिल्हा परिषद गटात भाजपाचे कमळ निश्चित फुलणार, असा ठाम विश्वास भाजपाचे तालुकाध्यक्ष काकासाहेब सरडे यांनी व्यक्त केला आहे. भाजपाचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या विकासकामांमुळे हा गट भाजपाच्या ताब्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

 

पत्रकारांशी बोलताना सरडे म्हणाले की, गेल्या तीन ते चार वर्षांत गणेश चिवटे यांनी वीट जि.प. गटासाठी मोठ्या प्रमाणावर विकासनिधी उपलब्ध करून दिला. या निधीतून रस्ते, पाणीपुरवठा, सार्वजनिक सुविधा तसेच नागरिकांच्या दैनंदिन गरजांशी संबंधित अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत.

 

सर्व गावांमध्ये समतोल आणि सर्वांगीण विकासावर भर देण्यात आल्यामुळे सामान्य नागरिकांना या कामांचा थेट फायदा झाला आहे. त्यामुळे गावोगावी गणेश चिवटे यांच्या कार्याची सकारात्मक चर्चा होत असून, जनतेमध्ये त्यांच्या नेतृत्वावर विश्वास निर्माण झाला आहे. विकासकामे आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीच्या जोरावर आगामी निवडणुकीत वीट जिल्हा परिषद गटात भाजपाचा विजय निश्चित आहे, असा विश्वासही सरडे यांनी व्यक्त केला.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close