
प्रतिनिधी/करमाळा (माय मराठी न्यूज)


जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले असून करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील कोर्टी जिल्हा परिषद गटातून केतूर व कोर्टी पंचायत समिती गण सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव ठरले आहेत. बदलत्या राजकीय समीकरणात अनेक नेते आपले नशीब आजमावण्याच्या तयारीत आहेत. याच पार्श्वभूमीवर ॲड. अजित विघ्ने यांनी केत्तूर गणातील मा.आ. संजयमामा शिंदे यांच्या सर्व कार्यकर्त्यांची चर्चा करून पंचायत समिती निवडणूक लढवावी. अशी मागणी संजयमामा शिंदे गटाचे कार्यकर्ते उदयसिंह खाटमोडे-पाटील यांनी केली आहे.
सन २०१२ च्या पंचायत समिती निवडणुकीत पश्चिम भागातील सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे प्रवक्ते ॲड. अजित विघ्ने यांनी निवडणूक लढवली होती. त्या वेळी त्यांचा अल्प मतांनी पराभव झाला होता. विघ्ने यांनी केतूर गावाचे उपसरपंच म्हणून काम पाहिले असून त्यांच्या पत्नी या केतूर गावच्या सरपंच राहिल्या आहेत. सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सातत्याने सहभाग राहिला आहे.
केतूर नं.१ ते केतूर नं.२ जोडणाऱ्या पुलाच्या कामात त्यांचा महत्त्वाचा वाटा असून पारेवाडी रेल्वे स्टेशनवर एक्सप्रेस गाडी थांबविण्याच्या मागणीसाठी त्यांनी स्थानिकांसोबत लढा दिला आहे. तसेच संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे.
संजयमामा शिंदे गटातील सर्व कार्यकर्त्यांशी विचारविनिमय करून ॲड. अजित विघ्ने यांनी पंचायत समिती केतूर गणातून निवडणूक लढवावी, अशी आमची आग्रही भूमिका असून त्यांच्या उमेदवारीची मागणी आम्ही माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडे करणार आहोत.
उदयसिंह खाटमोडे-पाटील, सामाजिक कार्यकर्ते, केत्तुर 2



