
प्रतिनिधी/अंगद भांडवलकर (माय मराठी न्यूज)


समाजकार्य, विकासकामे आणि लोकसंपर्काच्या बळावर चंद्रकांतकाका सरडे यांनी चिखलठाण जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरावे. अशी मागणी चिखलठाण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब सरडे यांनी मागणी केली आहे.
चंद्रकांत सरडे यांनी यापूर्वी ग्रामपंचायत सदस्य, लोकनियुक्त सरपंच, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य तसेच आजिनाथ सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन अशी विविध पदे भूषवून प्रभावी काम केले आहे.
चंद्रकांतकाका सरडे यांच्या वाढदिवसानिमित्त समाज प्रबोधनकार इंदुरीकर महाराजांचे कीर्तन, दरवर्षी रक्तदान शिबिरे आयोजित करून आजपर्यंत साडेतीन हजार रक्तपिशव्यांचे संकलन, वृक्षारोपण, गरजूंसाठी साखरवाटप, तसेच भाविक भक्तांसाठी तुळजापूर व राशीन येथे मोफत वाहनव्यवस्था असे अनेक उपक्रम राबविले जातात. त्यांनी गावाच्या विकासासाठी राळेगणसिद्धी व हिवरे बाजारसारख्या आदर्श गावांचा आदर्श घेत सोळा कोटी रुपयांची विकासकामे केली आहेत.
चंद्रकांतकाका सरडे यांनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास ग्रामस्थांचा आणि तरुणांचा प्रचंड पाठिंबा त्यांना मिळेल, कारण त्यांच्या कार्यातून विकास आणि समाजसेवेचा ठसा उमटला आहे.
श्री. दादासाहेब सरडे, ग्रामपंचायत सदस्य, चिकलठाण



