-->
करमाळाकृषी विषयक

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यांमध्ये फार्मर आयडी व फोटोची अट; शेतकऱ्यांमध्ये संभ्रम

 

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण (माय मराठी न्यूज)

 

तालुक्यातील अनेक भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, या नुकसानीच्या पंचनाम्यांमध्ये आता फार्मर आयडी व लोकेशनसह नुकसानीचा फोटो देण्याची अट असल्याचे संबंधित महसूल, ग्रामपंचायत व कृषी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये पंचनामे न झाल्यास मदत मिळण्यास अडचण निर्माण होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

 

शेतकऱ्यांना ठिबक सिंचन, शेततळे, पिकविमा अशा विविध कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांचे फार्मर आयडी पेंडिंग दाखवत असल्याने ते अनुदान व योजनांपासून वंचित राहत आहेत.


🟩 पंचनाम्यासाठी फार्मर आयडी बंधनकारक नाही

अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या पंचनाम्यांसाठी फार्मर आयडी व नुकसानीचा फोटो देणे बंधनकारक नाही. मात्र शेतकऱ्यांनी फोटो काढून ठेवले असल्यास ते नक्की सादर करावेत. इतर योजनांसाठी मात्र फार्मर आयडी आवश्यक आहे. पेंडिंग आयडी बाबत वरिष्ठांना कळवण्यात आले आहे.

– शिल्पा ठोकडे मॅडम, तहसिलदार करमाळा

 

🟩 पेंडिंग फार्मर आयडी बाबत मार्ग काढावा

अतिवृष्टी अनुदान व पंचनाम्यासाठी फार्मर आयडीची अट रद्द केल्याबद्दल प्रशासनाचे आम्ही आभारी आहोत. मात्र अनेक शेतकऱ्यांचे आयडी अजूनही प्रलंबित आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना कृषी योजनांचा लाभ मिळत नाही. प्रशासनाने याबाबत तात्काळ मार्ग काढावा.

– शंभूराजे फरतडे, युवासेना तालुकाप्रमुख (ठाकरे गट)

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close