-->
करमाळाकृषी विषयक

अतिवृष्टीमुळे राजुरीत फळबागांचे नुकसान; ग्रामपंचायतीकडून पंचनाम्याची मागणी

 

प्रतिनिधी/करमाळा (माय मराठी न्यूज)

 

करमाळा तालुक्यातील राजुरी गावात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर फळबागांचे नुकसान झाले आहे. याबाबत राजुरी ग्रामपंचायत तर्फे तहसीलदार, शिल्पा ठोकडे मॅडम यांच्याकडे नुकसानीचा पंचनामा करून भरपाई मिळावी. अशी मागणी सरपंच सोनाली राजेंद्र भोसले यांनी लेखी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.

 

ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अतिवृष्टीमुळे गावातील केळी, पपई, मोसंबी, डाळिंब आदी फळबागासह ऊस तसेच इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पावसामुळे पाण्याखाली गेलेल्या शेतीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे. त्यामुळे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळावी. अशी मागणी सरपंच सौ. मीनाक्षी राजेंद्र भोसले यांनी केली आहे.

 

या निवेदनावर सरपंच, उपसरपंच यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांच्या स्वाक्षरी आहेत. ग्रामपंचायतीने या संदर्भात प्रशासनाकडे तातडीने कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close