-->
करमाळा

करमाळा तालुका ग्रामरोजगार सहाय्यक संघटनेची नूतन कार्यकारिणी जाहीर

 

प्रतिनिधी/करमाळा (माय मराठी न्यूज)

 

करमाळा तालुक्यातील ग्रामरोजगार सहाय्यकांची बैठक दिनांक ३ ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषद विश्रामगृह, करमाळा येथे संघटनेचे वरिष्ठ सदस्य सुनील जगदाळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत संघटनेची नूतन कार्यकारिणी स्थापन करण्यात आली.

 

या बैठकीत तालुका अध्यक्षपदी दत्ता यादव हिरडे (पोथरे), उपाध्यक्षपदी महादेव किसन भिसे (पोंधवडी), सचिवपदी भास्कर सर्जेराव पवार (रावगाव), खजिनदारपदी अनिल काळे (कुंभेज), कायदेशीर सल्लागारपदी हेमंत जाधव (वडगाव) व सुनील जगदाळे (हिसरे) तर प्रसिद्धीप्रमुखपदी सचिन बोराडे (केडगाव) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

 

या बैठकीत ग्रामरोजगार सहाय्यकांना येणाऱ्या विविध अडचणी, शासनाने काढलेल्या परिपत्रकाची अंमलबजावणी, वेतनवाढ, घरकुल मस्टर आणि प्रवास भत्ता (टीए) यांसंबंधी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी नूतन कार्यकारिणीचा सत्कार करण्यात आला. उपस्थित सर्व सदस्यांचे आभार मानून बैठक संपन्न झाली.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close