-->
करमाळा

करमाळा फोटोग्राफर असोसिएशन ची नवीन कार्यकारिणी जाहीर

अध्यक्ष बापू पवार, उपाध्यक्ष योगेश ठोंबरे, सचिव अनिकेत राऊत तर खजिनदारपदी राज मुसळे खजिनदार यांची निवड

 

प्रतिनिधी/करमाळा (माय मराठी न्यूज)

 

करमाळा तालुक्यातील छायाचित्रकारांचे मुख्य व्यासपीठ असलेल्या करमाळा तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या वार्षिक निवडणुकीची प्रक्रिया आज उत्साहात पार पडली. सभासदांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत नवीन पदाधिकारी निवडी सर्वानुमते करण्यात आल्या.

 

या निवडीत अध्यक्षपदी बापू पवार, उपाध्यक्षपदी योगेश ठोंबरे, सचिवपदी अनिकेत राऊत आणि खजिनदारपदी राज मुसळे यांची एकमताने निवड करण्यात आली. निवड प्रक्रियेत पारदर्शकता ठेवण्यात आली असून सभासदांनी टाळ्यांच्या गजरात नविन कार्यकारिणीचे स्वागत केले.

 

नव्या पदाधिकाऱ्यांनी छायाचित्रकार बांधवांच्या हक्कांसाठी आणि व्यावसायिक प्रगतीसाठी नियोजनबद्ध उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त केला. करमाळा शहर व परिसरातील सर्व छायाचित्रकारांकडून नव्या कार्यकारिणीचे अभिनंदन होत आहे.

 

स्थानिक छायाचित्रकारांच्या संघटनेचे बळकटीकरण, प्रशिक्षण कार्यशाळा, तांत्रिक मार्गदर्शन आणि आधुनिक छायाचित्रण साधनांची माहिती उपलब्ध करून देणे हे नवीन पदाधिकारी प्राधान्याने राबवतील असा विश्वास या यावेळी बोलताना नवीन पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close