प्रतिनिधी/गजानन गव्हाणे पाटील

गुटखा बंदी असताना देखील अवैधपणे पुणे शहरात विक्री साठी आणलेला लाखो रुपयांचा अवैध गुटखा हडपसर पोलिसांच्या सतर्कतेमुळे पकडला गेला असून तब्बल ७१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती हडपसर पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी दिली असून हडपसर पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सर्फराज शेख, रा. गोकुळनगर, अप्पर डेपो, बिबवेवाडी, पुणे हा त्याचे आयशर ट्रक नं. MH-14-GU-8462 मध्ये तंबाखुजन्य पदार्थ (गुटखा) हा निपाणी व विजापुर येथून सोलापुर रोडने फुरसुंगी पुणे येथील गोडाऊनमध्ये जात आहे. वगैरे बातमी मिळाल्याने पोउपनि अविनाश शिंदे यांनी लागलीच सदरबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांना कळवून, त्यांनी सदर ठिकाणी स्टाफसह जावून खात्री करून कारवाई करणेबाबत सांगितलेवरुन १५ नंबर चौकाजवळ सोलापूर रोड या ठिकाणी पो.उपनि. आविनाश शिंदे, पो.शि. शाहिद शेख व पो.शि. टोणपे, पो.हवा. गव्हाणे, पो.ना. १४ ९९ मद्देल व पोशि खरात असे मिळुन सापळा लावला असता. मिळालेल्या बातमीप्रमाणे आयशर ट्रक नं. MH-14-GU-8462 हि येताना दिसताच सदरील ट्रक चालकास थांबवून ट्रक टेकवडे पेट्रोल पंपाच्या आत घेऊन ट्रक वरील चालक यास त्याचे नाव पत्ता विचारला असता त्याने आपले नाव सामीउल्लाह मुर्तजा हुसैन, वय ५१ वर्षे (रा. फाईल टिंबर कॉर्पोरेशन मुस्तफा बाजास एसएस मार्ग मुंबई, मुळगाव मुर्तजा ग्राम मुडीलाकला पोस्ट लोहरसन संत कबीर नगर उत्तरप्रदेश) असे असल्याचे सांगितले त्याचेकडे ट्रकमधे काय आहे. याबाबत चौकशी केली असता, तो उडवाउडीवची उत्तरे देवून लागलाने ट्रक ची पाहणी केली. तर त्यामध्ये “हिरा पान मसाला” गुटखा असल्याचे निदर्शनास आहे. त्यावेळी त्याचेकडे अधिक चौकशी केली असता त्याने सदरील गुटखा माल हा निपाणी कर्नाटक येथून घेवून आला असून, तो माल फुरसुंगी पुणे येथील गोडाऊनमध्ये खाली करण्यासाठी जात असल्याचे सांगितले.
लागलीच वरिष्ठांना कळवून अन्न सुरक्षा अधिकरी, अन्न व औषध प्रशासन विभाग पुणे यांचेशी संपर्क करुन त्यांना सदरबाबत कळविले असता अन्न सुरक्षा अधिकारी अनिल सदाशिवराव गवते (अन्न व औषध प्रशासन विभाग पुणे) व पोलीस निरीक्षक गुन्हे विश्वास डगळे हे स्टाफसह येवून, दोन पंचासमक्ष आयशर ट्रक व यामध्ये मिळुन आलेल्या हिरा पान मसाला या मालाची पाहणी करुन, सविस्तर पंचनामा करुन ताब्यात घेण्यात आला. सदरील सर्व हिरा पान मसाला, गुटखा माल अंदाजे एकुण किंमत रुपये ४६,००,०००/- व त्याची वाहतुक करणारा ट्रक २५,००,०००/- रुपये वगैरे असा एकुण ७१,००,०००/- लाख रुपयांचा मुद्देमाल पंचनाम्याने जप्त केलेला आहे. मात्र बाजारभावाने हा माल दुप्पट किंमतीस लोकांना विकला जात असल्याने बाजारभावाने जप्त गुटखा मालाची किंमत अंदाजे ९०,००,००० लाख रुपयांपर्यत होवू शकते. अन्न सुरक्षा अधिकारी अनिल गवते यांनी फिर्याद दिलेवरुन हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर येथे भा.द.वि. कलम २७२, २७३, ३२८ अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ चे कलम- २६ (२) (i), २६ (2) (iv) सहवाचन कलम ३ (i) (zz) चे उल्लंघन केल्याने कलम ५९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरीबद्दल अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपआयुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई हडपसर विभाग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, पोलीस निरीक्षक गुन्हें दिगंबर शिंदे, विश्वास डगळे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली सपोनि रत्नदिप गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक आविनाश शिंदे, पो.शि. शाहिद शेख व पो.शि. टोणपे, पो.हवा. गव्हाणे, पो.ना. १४९९ मद्देल, पो.ना. शरद धांडे, पो.शि. खरात यांनी केलेली आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे हे करीत आहेत.




