सिंधूची विजयी हॅटट्रिक; पदका पासून केवळ दोन विजय दूर
माय मराठी न्युज नेटवर्क


टोकियो ऑलिंपिक स्पर्धेचा आज सातवा दिवस आहे. आज भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने टोकियो ऑलिंपिकमध्ये महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. पी. व्ही. सिंधूने सलग तीन विजय मिळवत आपल्या विजयाची हॅटट्रिक केली असून पदकापासून केवळ दोन विजय दूर आहे.
रिओ ऑलिम्पिक मध्ये रौप्यपदक जिंकणाऱ्या सिंधुने डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्ट चा दोन सरळ सेटमध्ये पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत आपला प्रवेश निश्चित केला. सिंधूने मियाला चांगली लढत देत हा सलग तिसरा सामना जिंकला आहे. या सामन्यात सिंधूने डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्टचा २१-१५, २१-१३ असा पराभव केला आहे. या विजयामुळे सिंधूची मिया विरुद्धची आत्तापर्यंतच्या सामन्यांमधील कामगिरी ५-१ अशी झाली आहे. म्हणजेच आत्तापर्यंत या दोघींमध्ये झालेल्या सहा सामन्यांपैकी पाच सामने सिंधूने जिंकले आहेत.
पी.व्ही. सिंधूने हा सामना अवघ्या ४१ मिनिटांमध्ये जिंकला आहे. दरम्यान बुधवारी मुलींनीच विजयी कामगिरी करताना भारताला एकाच दिवशी तीन विजय मिळवून दिले आहेत. बॅडमिंटनमध्ये पी.व्ही. सिंधू ने बाद फेरीत प्रवेश केला असून बॉक्सिंग मध्ये पूजा राणी ने उपांत्यपूर्व फेरी गाठली तर तिरंदाजी मध्येही दीपिका कुमारीने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.




