प्रतिनीधी/प्रविण अवचर


आज सोमवार दिनांक ०६ डिसेंबर महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज ६५ वा महापरिनिर्वाण दिन यानिमित्त मांगी येथील नूतन ग्रामपंचायात सदस्य व सामाजिक कार्यकर्ते यांनी मांगी येथील पंचशील बुद्धविहारला ६५ पिंपळाची झाडे भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे.
करमाळा तालुक्यातील प्रत्येक सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे सुजित (तात्या) बागल हे तालुक्यासह गावातही वेगवेगळे समाजपयोगी उपक्रम राबवत असतात. सुजित तात्यांचे अगदी निस्वार्थी व प्रामाणिक कार्य असते. आज महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिनानिमित्त हा सामाजिक उपक्रम राबवला. ज्या वृक्षाखाली तपश्चर्या करून गौतम बुद्धांना दिव्यज्ञान प्राप्त झाले, असे हे पिंपळाचे झाड ज्याला बोधिवृक्ष म्हणून संबोधले जाते. ज्या वृक्षामुळे हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण वाढते. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पिंपळ हे वृक्ष खूप महत्वाचे समजले जाते.
आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त श्री. सुजित बागल यांनी प्रथम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेला हार घालून व बुद्धांचे मूर्तीला पुष्प वाहून पूजन केले. नंतर उपस्थित अनुयायांना पिंपळाच्या झाडाची महिती व महत्व सांगितले. हे झाड वर्षं भर जोपासनारांना सुजित तात्या यांच्यातर्फे भेट म्हणून गौतम बुद्धांची प्रतिमा देण्यात येणार आहे. तसेच दोन वर्ष हे झाड मोठे केल्यास झाड जोपासणारे यांचे लकी ड्रॉ पद्धतीने नंबर काढून त्या गृहिणीला सोन्याची नथ देण्यात येणार आहे. पूर्वीपासून सामाजिक कार्य करताना सुजित बागल हे जास्तीत जास्त “झाडे लावा, झाडे जगवा” हे आवाहन ग्रामस्थांना करतात व प्रत्येक कार्यक्रमात जास्तीत जास्त पर्यावरण पूरक वृक्ष देण्याचं कार्य करत असतात. त्यांच्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे तालुक्यात कौतुक होत आहे. आज हा कार्यक्रम अगदी मोजक्या अनुयायांचे उपस्थितीत कोरोना नियमांचे पालन करून पार पडला.
यानिमित्त मांगी येथील पैलवान पप्पू वस्ताद शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त करत महामानवाला अभिवादन केले. यावेळी मांगी येथील नूतन ग्राम पंचायत सदस्या कू. स्नेहलताई अवचर, मांगी येथील मातंग एकता आंदोलनचे श्री. रवींद्र शिंदे, पंचशील बुद्धविहार कमिटीचे सदस्य आयु. महेंद्र कुमार अवचर, अजिनाथ चव्हाण, शहाजी अवचर, अभिमान अवचर, नवनाथ अवचर, अजय अवचर, प्रेम चव्हाण, रोहन अवचर, अंकुश अवचर, सुरेश लोंढे, अक्षय बागल, हर्ष अवचर, शुभम अवचर, संतोष चव्हाण यांचे सह आदी कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थित अनुयायांचे आभार कु. स्नेहल अवचर यांनी मानले व त्यांनतर प्रवीण अवचर यांनी बुद्ध वंदना घेऊन कार्यक्रमाची सांगता केली.



