-->
करमाळा

आवाटी-कोर्टी रस्त्याचे काम धिम्या गतीने; रस्त्यावरून घसरून मोटारसायकल चालकाचा अपघात

करमाळा प्रतिनिधी

आवाटी ते कोर्टी या रस्त्याचे काम एन पी कंट्रक्शन या कंपनीमार्फत सुरू असून हे काम करत असताना कोणत्याही प्रकारची सुरक्षा यंत्रणा वापरात नसल्यामुळे वारंवार अपघात होत आहेत. आज पडलेल्या रिमझिम पावसामुळे रस्त्यावर चिखल झाला आहे. या चिखला वरून गाड्या घसरून अनेक अपघात झाले आहेत. असाच एक अपघात आज अर्जुन नगर येथील दादासाहेब पवार हे रस्त्यावरून जात असताना चिखलामुळे गाडी वरून पडून गंभीर जखमी झाले आहेत. त्यांचा पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

या रस्त्याचे काम करताना जागोजागी इशारा फलक लावणे गरजेचे आहे. दोन महिन्यापूर्वी याच रस्त्यावर एका पुलाच्या कामावर सूचनाफलक नसल्यामुळे एक मोटारसायकल चालक थेट शेजारी खोदलेल्या खड्ड्यात कोसळून ठार झाला होता. या मयताचे प्रेत ताब्यात घेण्यास गावकऱ्यांनी विरोध केल्यानंतर संबंधित मयताच्या नातेवाईकाला दमदाटी करण्यात आली. या रस्त्यावर सुपरवायझर म्हणून नेमलेले गुंड कोणी तक्रार करणार असेल तर त्याला दमबाजी करतात. सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी तर या ठेकेदाराच्या ताटाखालची मांजर झाली आहेत. अशी चर्चा नागरिकांमधून होत असून दाद कोणाला मागायची असा प्रश्न सामान्य नागरीकांना पडला आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close