-->
करमाळाकृषी विषयक

जमिनीच्या सुपिकतेसाठी माती परीक्षण गरजेचे; कृषिकन्या कल्याणी गुटाळ

 

केम प्रतिनिधी/संजय जाधव

करमाळा तालुक्यातील केम येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत श्रीराम कृषी महाविद्यालय, पानीव आयोजित ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत श्रीराम कृषि महाविद्यालयाची कृषीकन्या कल्याणी भालचंद्र गुटाळ या विद्यार्थिनीने शेतकऱ्यांमध्ये माती परीक्षणसंबंधी जनजागृती व्हावी, यासाठी आयोजन केले होते.

शेतकऱ्यांमध्ये माती परीक्षण संबंधी जनजागृती व्हावी, यासाठी उपक्रम राबविण्यात आला. माती परीक्षणामुळे जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण समजते. त्यानुसार खतांचा पुरवठा करणे सोपे जाते. खारपट व चोपण जमिनी सुधारण्यासाठी माती परीक्षणाचा फायदा होतो. तसेच पिकांच्या वाढीस आवश्यक असलेल्या अन्नद्रव्यांचा समतोल राखता येतो. शेतकऱ्यांनी माती परीक्षणानुसार खत व्यवस्थापन करावे, असा सल्ला कृषिकन्या कल्याणी भालचंद्र गुटाळ हिने दिला. याबरोबरच शेतातील मातीचे नमुने गोळा करून त्याचे परीक्षण करण्यात आले. मातीमध्ये असणारे घटक, जमिनीचा सामू, मातीचा प्रकार याविषयी शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन देण्यात आले.

यावेळी केम गाव येथील प्रगतशील शेतकरी घाडगे गजानन, तळेकर सतीश इ. उपस्थित होते. श्रीराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. श्री प्रकाश पाटील, सचिव सौ. श्रीलेखा पाटील, सहसचिव करण पाटील, ॲंड. अभिषेक पाटील व संस्थेतील सर्व पदाधिकारी तसेच श्रीराम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. बी. हाके व कार्यक्रम अधिकारी डॉ. जे. आय. शेख, डॉ. के. यु. देशमुख, प्रा. आर. बी घोगरे यांचे मार्गदर्शन लाभले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close