-->
करमाळामाहिती विषयक

करमाळा भूमी अभिलेख कार्यालयात सीसीटीव्ही बसवावे; आयुब शेख यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

 

करमाळा/प्रतिनिधी

 

करमाळा येथील उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे. अशी मागणी ऑल इंडिया ह्यूमन राइट चे करमाळा तालुका अध्यक्ष तसेच सोलापूर जिल्हा शांतता समितीचे सदस्य आयुब शेख यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे केली आहे.

 

जिल्हाधिकारी यांना पाठविलेल्या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, सध्या भूमी अभिलेख कार्यालयात कोणतेही कामकाज वेळेत होत नसून त्या कार्यालयातील कर्मचारी कार्यालयीन कामकाज करण्यासाठी अक्षरशा पैशाची वारेमाप मागणी करीत आहेत. अशी चर्चा जन माणसातून होत असल्याचे समजते. याला पायबंध घालण्यासाठी सी सी टीव्ही कॅमेरे बसविण्याची अत्यंत आवश्यकता आहे. तेव्हा जिल्हाधिकारी यांनी या कार्यालयाकडे विशेष लक्ष देऊन संबंधित खात्याला सीसीटीव्ही बसवण्याचा आदेश द्यावा. सध्या भूमी अभिलेख कार्यालयात सर्वसामान्यांची कामे वेळेवर होत नाहीत. याशिवाय सदर कार्यालयातील कर्मचारी कधीही वेळेवर हजर नसतात. तेव्हा सीसीटीव्ही बसवणे आवश्यक आहे. अशी मागणी श्री शेख यांनी निवेदनाच्या शेवटी केली आहे.

 

अधिक माहितीस्तव श्री शेख यांनी या निवेदनाच्या प्रती जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख सोलापूर, तहसीलदार कार्यालय करमाळा तसेच महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य यांना पाठविल्या आहेत.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close