विहिंप च्या सौ. अश्विनी(ताई) रासकर (माळी) यांची भाजपा महिला आघाडी सरचिटणीस पदी निवड

प्रतिनिधी


विश्व हिंदू परिषद, पश्चिम महाराष्ट्र प्रांत दुर्गा वाहिनीच्या सहसंयोजिका सौ. अश्विनीताई शेखर रासकर (माळी) यांची भारतीय जनता पार्टी हडपसर विधानसभा मतदारसंघ महिला आघाडी सरचिटणीस पदी निवड झाली आहे. अश्विनीताई माळी या लहानपणापासून संघ परिवारामध्ये काम करत आहेत. तसेच त्यांनी लव जिहाद, गोरक्षण, महिला सशक्तीकरण इत्यादी आयामांमध्ये काम केलेले आहे. त्यांनी अनेक वेळा हिंदुत्ववादी मुद्द्यावर यशस्वी आंदोलने केलेली आहेत. त्यांच्या या कामाची दखल घेऊन भारतीय जनता पार्टीने त्यांच्याकडे हडपसर मतदार संघाच्या महिला आघाडीची सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपवली आहे.

या निवडी वेळी मा. आमदार योगेश अण्णा टिळेकर, मा. सरपंच शिवराज आप्पा घूले, हडपसर विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष संदीप दळवी, सरचिटणीस समीर दादा घुले, परिवर्तनच्या महिला अध्यक्षा शोभाताई लगड, पुणे शहर महिला आघाडीच्या सरचिटणीस सीमा शेंडे आदी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



