-->
करमाळाराजकिय

गणेश चिवटे यांच्या हस्ते वीट येथे ८१.५ लाख रुपयांच्या विकास कामाचे उद्घाटन

 

करमाळा/प्रतिनिधी

 

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. चंद्रकांत दादा पाटील व माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून करमाळा तालुक्यातील विट या गावासाठी ८१.५ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन मंगळवार दि. २३ जानेवारी रोजी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा भाजप नेते गणेश चिवटे यांच्या हस्ते करण्यात आले.

 

यामध्ये वीट ते बरडे वस्ती रस्ता १० लाख रु, इनामदार वस्ती ते आढळेवस्ती रस्ता ६ लाख रु, शाळा दुरुस्तीमध्ये विट गाव शाळा २ लाख रु, गाडे वस्ती शाळा ३ लाख रु व चोपडे वस्ती शाळा २ लाख रु, रेवननाथ मंदिर पत्रा शेड व घट बांधणीसाठी ७ लाख रु, राघू चांदणे ते कोंढाबाई चांदणे घर (अण्णाभाऊ साठेनगर) ७ लाख रु, आरोग्य उपकेंद्र दुरुस्ती ७ लाख रु, दलित वस्ती स्मशानभूमी सूशोभीकरण व पेव्हर ब्लॉक रस्ता ४ लाख रु, सुभाष जाधव वस्ती डीपी बसविणे ४ लाख रु, गाडे वस्ती ते अंकुश ढेरे वस्ती रस्ता ४ लाख रु,कैकडी मळा सहा लाख रु, हनुमंत आवटे डीपी बसविणे ३ लाख रु, भोसले वस्ती डिपी बसविणे ८.५ रु, स्ट्रीट लाईट ५ दिवे बसविणे ८ लाख रु इत्यादी कामाचा समावेश आहे.

 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भगवानगिरी गोसावी यांनी केले. तर गणेश चिवटे यांनी आपल्या मनोगतात वीट गावच्या विकासासाठी भविष्यातही जास्तीत जास्त निधी खा. रणजितसिंह निंबाळकर व पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या माध्यमातून आणण्याचा प्रयत्न करीन असे अभिवचन दिले. विट गावासाठी चिवटे यांनी भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल वीट ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.

 

या विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी जि. प. सदस्य बिभीषण आवटे, सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब गाडे, उपसरपंच अंकुश जाधव, भगवानगिरी गोसावी, अशोक ढेरे, देविदास ढेरे, हर्षद गाडे, ग्रामपंचायत सदस्य गजानन भोसले, विशाल गणगे, महादेव जाधव, गणेश ढेरे, जगदीश निंबाळकर, धनसिंग भोंग, रोजगार हमी सेवक कृष्णा ढेरे, माजी उपसरपंच समाधान कांबळे, सुभाष जाधव, ग्रामपंचायत सदस्य हेमंत आवटे, आजिनाथ पवार, पोपट गाडे, बाळासाहेब ढेरे, तंटामुक्ती अध्यक्ष दत्तात्रय गाडे, विश्वनाथ ढेरे, माजी ग्राम. सदस्य हरी आवटे, आप्पा जाधव, अर्जुन आवटे, अशोक राऊत, जालिंदर गाडे, सुभाष गाडे, संतोष ढेरे, संजय गाडे, दत्तात्रय गाडे, रवी ढेरे, हनुमंत आवटे, मनोज ढेरे, अविनाश गाडे, लहू गाडे, दादा ढेरे, अमोल आढळे, विलास जाधव, आश्रू कांबळे, उमेश गाडे, रवी गाडे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close