अनुसूचित जमातीच्या तालुकाध्यक्षपदी बाळासाहेब मल्लाव यांची नियुक्ती
कोरेगाव भीमा प्रतिनिधी/गजानन गव्हाणे पाटील


हवेली तालुका अनुसूचित जमाती च्या हवेली तालुकाध्यक्षपदी पेरणे ग्रामपंचायत चे माजी सदस्य व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब मल्लाव यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. सदर निवडीचे पत्र भाजपा चे हवेली तालुकाध्यक्ष पै. संदीप आप्पा भोंडवे यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष दशरथ वाळके, राहुल गुंडकर, मनोज गायकवाड, मंगेश वाळके, रामभाऊ कोळपे, तुषार गायकवाड, सुजय वाळके, गोरक्ष मल्लाव, आदेश मलाव, नितीन मल्लाव, दत्तात्रय मल्लाव, गोविंद मल्लाव, अक्षय कंचे, भानुदास मल्लाव आदी यावेळी उपस्थित होते. समाजातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवून शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या प्रत्येक योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहचण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून येणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत संपूर्ण तालुक्यातील अनुसूचित जमाती चे मतदार भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष बाळासाहेब मल्लाव यांनी यावेळी सांगितले.



